Join us

​RIP Shashi Kapoor : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शशी कपूर यांना वाहिली श्रद्धांजली !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2017 19:57 IST

सदाबहार अभिनेता शशी कपूर यांचे नुकतेच निधन झाले. गेल्या तीन आठवड्यापासून शशी कपूर आजारी होते. त्यांनी ७९ व्या वर्षी ...

सदाबहार अभिनेता शशी कपूर यांचे नुकतेच निधन झाले. गेल्या तीन आठवड्यापासून शशी कपूर आजारी होते. त्यांनी ७९ व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. कपूर घराण्यातला राजबिंडा,देखणा हिरो म्हणजे शशी कपूर.. ज्यांचं हँडसम असणं देखणं दिसणं यावर तरुणी जीव ओवाळून टाकायच्या अशा अभिनेता शशी कपूर यांचे (४ डिसेंबर ) रोजी निधन झाले. १८ मार्च १९३८ साली कोलकतामध्ये शशी कपूर यांचा जन्म झाला.. घरातूनच मिळालेला अभिनयाचा वारसा त्यांनीही जपला..अनेक सिनेमात त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या. शशी कपूरने वयाच्या चवथ्या वर्षापासून आपल्या वडिलांद्वारा निर्मित नाटकांमध्ये काम करणे सुरु केले होते. या जेष्ठ अभिनेत्याच्या निधनाने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रद्धांजली वाहिली आहे. मोदींनी ट्वीट केले आहे की, ‘शशी कपूर अष्टपैलू अभिनेता होते. त्यांचे चित्रपट थियटरमध्येच पाहिले जाऊ शकतात. त्यांचा शानदार अभिनय येणाऱ्या पिढीसाठी  अविस्मरणीय असेल. त्यांच्या निधनाने दु:ख होत आहे. त्यां च्या परिवारास आणि प्रशंसकांना सांत्वन...!’ }}}}