Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘रिल लाईफ’ मुली फातिमा आणि सान्या यांना आमिर खान का देतोय पियानोचे धडे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2017 13:47 IST

‘दंगल’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडच्या ग्लॅमरस जगात अभिनेत्री फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा यांनी पाऊल ठेवले. या दोघी आमिरच्या ‘रिल लाईफ’ मुली असल्याने त्यांच्यासोबत आमिरची उत्तम बाँण्डिंग जमल्याचे दिसतेय. तो त्यांना पियानोचे धडे देतोय..कशासाठी ते वाचा...

कलाकार हा अष्टपैलू असला पाहिजे. अभिनयासोबतच त्याला इतर कलांचीही आवड असणे अपेक्षित असते. ‘बी टाऊन’ चे अनेक कलाकार असे आहेत की ज्यांना अभिनयासोबतच इतर आवडीनिवडी देखील आहेत. आता तुम्ही म्हणाल या सर्वाचा आमिर खानसोबत काय संबंध? तर होय, संबंध आहे. कारण, आमिर खान सध्या त्याच्या ‘आॅनस्क्रीन मुली’ म्हणजेच फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा यांना पियानोचे धडे देतो आहे. आमिर खानला स्वत:लाच पियानो वाजवायला प्रचंड आवडतं. त्याच्या घरात अत्यंत महागडा असा पियानो त्याने स्वत:च्या विरंगुळ्यासाठी खरेदी करून ठेवलेला आहे. फातिमाने सोशल मीडियावर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. ज्यात आमिर खान पियानो वाजवत आहे. सान्या त्याच्याभोवती फिरून पियानो वाजवायला शिकते आहे. ‘दंगल’ चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर ३५० कोटींची कमाई केली. महावीर फोगट या पहलवानाच्या आयुष्यावरील बायोपिकमध्ये आमिर खानने फोगट यांची भूमिका केली होती. त्यांच्या मुली गीता आणि बबिता यांची भूमिका फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा यांनी साकारल्या आहेत. चित्रपटात आमिरने या दोघींना पहलवानकीचे शिक्षण देऊ केले होते. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आमिर खान, फातिमा आणि सान्या यांच्यामध्ये ग्रेट बाँण्डिंग तयार झालं. फातिमा आणि सान्या यांना आमिर खान स्वत:च्या मुलींप्रमाणेच वागवू लागला. अलीकडेच हे तिघे करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’च्या शोवर आले होते. तिथेही त्यांच्यातील बाँण्डिंग सर्वांना समजून आली. आमिर खान याने फातिमा आणि सान्या यांना पहलवानकीचे शिक्षण दिले आता तो पियानोचे धडे देतोय यामागेही काही कारण असेल का? तर नाही. अर्थात सध्या तरी तशी काही माहिती माध्यमांपर्यंत पोहोचलेली नाही. कदाचित ते तिघे पुन्हा एखाद्या चित्रपटात दिसू शकतील! Also Read :* ​‘दंगल’ची लहानगी गीता अभिनयात अन् अभ्यासातही अव्वलजायरा वसीमच्या समर्थनार्थ आमिर खानचे ट्विट