Join us

#Factcheck: रणबीर कपूर, नीतू कपूर यांनाही कोरोनाची लागण? रिद्धिमा कपूरने सांगितले सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2020 09:55 IST

महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन कोरोना पॉझिटीव्ह आहेत हे कळताच बॉलिवूड इंडस्ट्रीत खळबळ माजली. यानंतर लगेच रणबीर कपूर, नीतू सिंग कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याची बातमी पसरली.

ठळक मुद्देशनिवारी रात्री उशीरा बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट केले होते.

महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन कोरोना पॉझिटीव्ह आहेत हे कळताच बॉलिवूड इंडस्ट्रीत खळबळ माजली. यानंतर लगेच रणबीर कपूर, नीतू सिंग कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याची बातमी पसरली आणि ही व्हायरल झालेली बातमी वाचून रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर हिचा पारा चढला. ही फेक न्यूज आहे, असे स्पष्ट करत तिने अशा बातम्या पसरवणा-यांबद्दल चांगलाच संताप व्यक्त केला.‘केवळ लक्ष वेधण्यासाठी अशी बातमी दिली आहे का? अशा बातम्या पसरवण्याआधी खरे की खोट तरी तपासा. आम्ही ठीक आहोत आणि ठणठणरत आहोत. अफवा पसरवणे बंद करा,’ असे रिद्धिमाने लिहिले.

  रणबीर व नीतू कपूर यांना करोनाची लागण झाल्याचे ट्विट एका युजरने केले होते. ‘कन्फर्म्ड रणबीर कपूर, नीतू कपूर व करण जोहर यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. अमिताभ बच्चनचा नातू अगस्त नंदाने रिद्धिमा कपूरने होस्ट केलेली बर्थ डे पार्टी अटेंड केली होती,’ असे ट्विट या युजरने केले होते. हे ट्विट क्षणात व्हायरल झाले होते. पण रिद्धिमाने ही निव्वळ अफवा असल्याचे आता स्पष्ट केले आहे.

   शनिवारी रात्री उशीरा बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट केले होते. मी कोव्हिड 19 पॉझिटीव्ह आढळलो आहे, असे त्यांनी आपल्या टिष्ट्वटमध्ये लिहिले होते. तूर्तास त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिषेक बच्चनचाही करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तर ऐश्वर्या राय बच्चन, जया बच्चन व आराध्या बच्चन यांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती समोर येत आहे.  

टॅग्स :रणबीर कपूरनितू सिंग