जुहूच्या रस्त्यावरचा भिकारी अन् रिचर्ड गेअर!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2016 22:19 IST
मुंबईच्या गजबजलेल्या जुहू रस्त्याच्या एका कडेला अलीकडे एक गरिब भिकारी हार्मोनियमसह सोनू निगमचे गाणे गाताना दिसला. तो भिकारी म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून सोनू निगमच होता. पोटापाण्यासाठी रस्त्यांवर गाणाºया गायकांना सन्मान मिळवून देणे, त्यांना ओळख मिळवून देणे, हा सोनूचा यामागचा उद्देश होता. पण शेवटी सोनूला ही प्रेरणा मिळाली तरी कशी??
जुहूच्या रस्त्यावरचा भिकारी अन् रिचर्ड गेअर!!
मुंबईच्या गजबजलेल्या जुहू रस्त्याच्या एका कडेला अलीकडे एक गरिब भिकारी हार्मोनियमसह सोनू निगमचे गाणे गाताना दिसला. रस्त्यावरून ये-जा करणाºया अनेक वाटसरूंनी त्याला पाहिले. पण कुणीही त्याला ओळखू शकले नाही..पण जेव्हा तो गायला लागला, तेव्हा या आवाजाने अनेकांना भुरळ पाडली. त्या आवाजाने रस्त्यांवरच्या अनेकांना थांबण्यास भाग पाडले. रस्त्याच्या कडेला याचना करणारा या भिकाºयाचा आवाज हुबेहुब बॉलिवूडचा नामवंत गायक सोनू निगम याच्यासारखा होता. भिकारी नव्हे तर प्रत्यक्षात सोनूच गातो आहे, असे अनेकांना वाटते... पण असे कसे होणार? पण नेमके असेच झाले. तो भिकारी म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून सोनू निगमच होता. पोटापाण्यासाठी रस्त्यांवर गाणाºया गायकांना सन्मान मिळवून देणे, त्यांना ओळख मिळवून देणे, हा सोनूचा यामागचा उद्देश होता. याचा व्हिडिओ सोनूने सोशल मीडियावर शेअर केला. निश्चितपणे त्याचा हा व्हिडिओ लाखो लोकांपर्यंत पोहोचला. आपल्या धकाधकीच्या आयुष्यातील चार दोन क्षण बाजूलर काढा आणि आनंद तुमच्या अवती भवतीच आहे. तो शोधा..हेच माझे लोकांना सांगणे आहे.याचसाठी मी हा प्रयोग केला, असे सोनूने सांगितले. सोनूचा हा प्रयत्न निश्चितपणे वाखाणण्याजोगा होता. पण शेवटी सोनूला ही प्रेरणा मिळाली तरी कशी?? कदाचित हॉलिवूड अभिनेता रिर्चर्ड गेअर याच्याकडून!! रिचर्डनेही आपल्या ‘टाईम आऊट आॅफ मार्इंड’या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान काहीसे असेच केले होते.या चित्रपटात रिचर्डने एका घरदार नसलेल्या मानसिकदृष्ट्या अस्थिर व्यक्तिची भूमिका साकारली होती. अलीकडे एका मुलाखतीत रिचर्डने हा किस्सा सांगितला. तो म्हणाला,या चित्रपटासाठी मी न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर मेकअप करून बसलो. बेघर माणसाच्या गेटअपमधील मला खरेच कुणीही ओळखले नाही. मी कितीतरी वेळ रस्त्यांवर वावरलो आणि सुपरलाँग लेन्सेसने चित्रपटासाठी अगदी खरे वाटावेत, असे अनेक सीन्सही दिले...