Join us

​यश मिळवण्यासाठी या गोष्टींमध्ये कॉम्प्रमाईज करायला सांगितले होते रिचा चड्ढाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 11:34 IST

रिचा चड्ढाने ओए लकी लकी ओए या चित्रपटापासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर गँग्स ऑफ वस्सेपूर, फुर्के, मसान यांसारख्या ...

रिचा चड्ढाने ओए लकी लकी ओए या चित्रपटापासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर गँग्स ऑफ वस्सेपूर, फुर्के, मसान यांसारख्या चित्रपटात तिने खूप चांगल्या भूमिका साकारल्या. रिचाने आज बॉलिवूडमध्ये चांगलेच यश मिळवले आहे. यासाठी तिने खूप मेहनत घेतली आहे. रिचाचा बॉलिवूडमध्ये कोणीही गॉडफादर नसल्याने बॉलिवूडमध्ये स्थिरावणे तिच्यासाठी खूप कठीण होते. तिला हे यश मिळवण्यासाठी खूप स्ट्रगल करावा लागला असे तिने तिच्या एका मुलाखतीत नुकतेच सांगितले आहे. एवढेच नव्हे तर यश मिळवण्यासाठी काही कॉम्प्रमाईजेस देखील करण्याची गरज असते असे तिला अनेकांनी सांगितले होते. पण तिने या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले. रिचा ही बॉलिवूड इंडस्ट्रीसाठी आऊटसायडर होती आणि त्यामुळे तुला यश मिळावायचे असेल तर एखाद्या क्रिकेटरला अथवा अभिनेत्याला डेट कर असा सल्ला तिला तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेकांनी दिला होता. याविषयी रिचा सांगते, मी ज्यावेळी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, त्यावेळी एका पीआरने मला एका अभिनेत्याचा नंबर दिला होता आणि सांगितले होते या अभिनेत्याला मेसेज कर आणि त्याच्यासोबत डेटवर जा... त्यावर त्या अभिनेत्याचे लग्न झाले आहे, मी त्याच्यासोबत डेटवर कशी जाऊ शकते असे मी त्या पीआरला उत्तर दिले होते. त्यावर त्या पीआरने मला एका क्रिकेटरला मेसेज करायला सांगितले आणि तो पीआर म्हणाला, क्रिकेटर अथवा अभिनेत्याला डेट करणे हे माझ्या करियरसाठी चांगले आहे. त्याचा फायदा मला भविष्यात नक्कीच होईल. पण रिचाने नेहमीच लोकांच्या या सगळ्या सल्ल्यांकडे दुर्लक्ष केले. बॉलिवूडमध्ये सुरुवातीला रिचाचे कोणीही फ्रेंड्स नसल्याने स्वतःला ग्रुम कसे करायचे याविषयी रिचाला काहीच माहीत नव्हते. गँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटाच्या वेळी तर तिच्याकडे फॅशन डिझायनर अथवा स्टायलिस्टही नव्हता. त्यामुळे ती कोणत्याही पार्टीला जायच्या आधी जुहूमधील एका मॉलमधून कपडे विकत घेत असे आणि तिथल्याच पार्लरमध्ये तयार होऊन पार्टीला जात असे. रिचाने तिचे करियर केवळ तिच्या मेहनतीमुळे निर्माण केले आहे असे ती सांगते. Also Read : जर, रिचा चड्ढा मांजर असती!!