Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऋचा चढ्ढा म्हणतेय, सोशल मीडियावर मिळणाऱ्या शिव्यांची चिंता नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2017 14:56 IST

सध्या सोशल मीडियावरून बॉलिवूडमधील अनेक दिग्गज सेलिब्रेटी चर्चेत आहेत. त्यातच सोशल मीडियावर ‘ट्रोल’ हा विषय गाजत असून, त्यात आता ...

सध्या सोशल मीडियावरून बॉलिवूडमधील अनेक दिग्गज सेलिब्रेटी चर्चेत आहेत. त्यातच सोशल मीडियावर ‘ट्रोल’ हा विषय गाजत असून, त्यात आता अभिनेत्री ऋचा चढ्ढा हिचीही भर पडली आहे. कारण ऋचा म्हणतेय की, सोशल मीडियावर मिळणाºया शिव्या आणि ट्रोलची तिने कधीच चिंता केली नाही. ऋचा पणजी येथे फॅशन डिझायनर संगीता शर्मा यांनी आयोजित केलेल्या इंडिया बीच फॅशन वीक २०१७ मध्ये सहभागी झाली होती. खरं तर ऋचाला रूपेरी पडद्यावर बोल्ड भूमिका साकारण्यासाठी ओळखले जाते. मात्र तिच्या विचारातही हा बोल्डपणा असल्याचे तिच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले. जेव्हा ऋचाला विचारण्यात आले की, तू कधीच तुझे मत मांडण्यास घाबरत नाहीस, तुला बदनामीची भीती वाटत नाही का? त्यावर उत्तर देताना ऋचा म्हणाली की, मी असे केल्यास काय होऊ शकेल? फार तर लोक मला शिव्या देतील, ट्विटवर वेगवेगळ्या नावाने मला बोलावतील, याची मी कधीच चिंता केली नाही. पुढे बोलताना ऋचा म्हणाली की, हे बघा अर्थव्यवस्थेची स्थिती खूपच वाइट आहे. बºयाचशा लोकांकडे नोकरी नाही. त्यामुळे बºयाचशा अशा लोकांना केवळ इतरांना ट्रोल करण्यासाठी भरती केलेले आहे. हे लोक केवळ इंटरनेटवर इतरांवर टीका करण्याचे काम करीत असतात. जर बेरोजगारीमुळे अशा लोकांना ही जबाबदारी दिली असेल तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. कारण त्यांची ही नोकरी फार काळ टिकणारी आहे. त्याचबरोबर ऋचाने असेही म्हटले की, लोकांना शिव्या देण्यासाठी पूर्ण ट्रोल मशिनरी काम करीत आहे. त्यामुळे मी खरोखरच या गोष्टीची कधी चिंता केलेली नाही. माझ्या मते, इतरांच्या साहाय्याने दुसºयाला शिविगाळ किंवा गैरवर्तन करणे हवेत दगड मारल्याप्रमाणे असतो. ऋचाने २००८ मध्ये ‘ओए लक्की लक्की ओए’ या सिनेमातून बॉलिवूड करिअर सुरुवात केली आहे. आतापर्यंत तिने ‘गॅँग्स आॅफ वासेपूर‘, ‘फुकरे’, ‘गोलियों की रासलीला रामलीला’ आणि ‘सरबजीत’ यांसारख्या सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. यावेळी ऋचाला एक अभिनेत्री म्हणून तू स्वत:ची ओळख निर्माण केली, असेही विचारण्यात आले होते. त्यावर बोलताना ऋचा म्हणाली की, मला ही बाब जाणवते. मी तुम्हाला सांगू इच्छिते की, असे मला विचारणे माझ्यासाठी कौतुक केल्यासारखेच आहे. माझ्यासोबतच्या अनेक कलाकारांसोबत जेव्हा मी रस्त्याने फिरत असते. तेव्हा लोक मला केवळ पाचच मिनिटांत ओळखतात. याचा अर्थ मी खूप प्रसिद्ध आहे, असे नाही तर माझ्या छबीमुळे हे सर्व मला अनुभवयास मिळत आहे. मी ज्या पद्धतीच्या भूमिका साकारल्या आहेत, त्यातील माझे शारीरिक हावभाव आजही लोकांच्या स्मरणात असल्याचेही ऋचा म्हणाली. ऋचा सध्या तिच्या करिअरच्या चांगल्या काळाचा अनुभव घेत आहे.