Join us

​‘बार बार देखो’चे पोस्टर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2016 18:49 IST

अखेर प्रतीक्षा संपलीच...होय, कॅटरिना कैफ आणि सिद्धार्थ रॉय या जोडीचा पहिला वहिला चित्रपट ‘बार बार देखों’चे पोस्टर आज अखेर ...

अखेर प्रतीक्षा संपलीच...होय, कॅटरिना कैफ आणि सिद्धार्थ रॉय या जोडीचा पहिला वहिला चित्रपट ‘बार बार देखों’चे पोस्टर आज अखेर रिलीज झाले. कॅट आणि सिद्धार्थची केमिस्ट्री म्हणजे एकदम हॉट..किमान पोस्टर बघितल्यावर तरी असे वाटते. नारंगी रंगाच्या स्विमसूटमधील कॅट सिडच्या पाठीवर बसलेली आहे आणि आनंदाने खिदळत आहे, असे हे पोस्टर पाहिल्यानंतर चित्रपटाबद्दलची उत्सूकता आणखीच वाढते. नित्या मेहता दिग्दर्शित हा चित्रपट येत्या ९ सप्टेंबरला रिलीज होणार आहे..तेव्हा जस्ट वेट...