Join us
Daily Top 2Weekly Top 5

"परेदसी परदेसी" गाण्यामुळे रातोरात झाली होती प्रसिद्ध, अभिनेत्रीला आता ओळखणेही कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 19:04 IST

'राजा हिंदुस्तानी' सिनेमातले ''परदेसी परदेसी'' या गाण्याने तर एकच धमाल उडवून दिली होती.या एका गाण्यामुळेच अभिनेत्री प्रतिभा सिन्हाने सर्वांची पसंती मिळवली होती.

आमिर खान आणि करिश्मा कपूर या जोडीने 'राजा हिंदुस्तानी' सिनेमातून रसिकांची भरघोस पसंती मिळवली होती.सिनेमातल्या इतर कलाकारांचीही वेगळीच ओळख निर्माण झाली होती. सिनेमात ''परदेसी परदेसी'' या गाण्याने तर एकच धमाल उडवून दिली होती.या एका गाण्यामुळेच अभिनेत्री प्रतिभा सिन्हाने सर्वांची पसंती मिळवली होती. डान्सनेच नाहीतर तिच्या सौंदर्यावरही रसिक फिदा झाले होते.

आजही या गाण्याची जादू कायम आहे. तितक्याच आवडीने हे गाणे ऐकले जाते. पण या गाण्यातून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री प्रतिभा सिन्हा मात्र बॉलिवूडमधून गायब आहे. प्रतिभा सिन्हा ही ज्येष्ठ अभिनेत्री माला सिन्हा यांची मुलगी आहे. 'मेहबूब मेरे मेहबूब' या सिनेमातून प्रतिभाने आपल्या करिअरला सुरुवात केली होती.

प्रतिभाचे फिल्मी करिअर खूप कमी वेळासाठी होतं. फक्त 13 सिनेमांमध्ये प्रतिभा झळकली होती. प्रतिभाने 'कल की आवाज', 'दिल है बेताब', 'एक था राजा', 'तू चोर मैं सिपाही', 'राजा हिंदुस्तानी', 'गुदगुदी', 'दीवाना मस्ताना', 'कोई किसी से कम नहीं', 'जंजीर' आणि 'मिलिट्री राज' या सिनेमात काम केले होते. 

प्रतिभा तिच्या फिल्मी करिअरपेक्षा अफेअरमुळेच जास्त चर्चेत राहिली होती. म्यूझिक डायरेक्टर नदीम सैफीसोबतचे अफेअर प्रचंड गाजले होते.मात्र प्रतिभा सिन्हाची आई माला सिन्हा यांना मात्र या दोघांचे नाते मान्य नव्हते. दोघांच्या लग्नालाही त्यांनी नकार दिला होता. प्रतिभाने दिलेल्या एका मुलाखतीत लग्नाबद्दल खुलासा केला होता. आधी नदीमसोबत लग्न करणार असल्याचं म्हटलं होतं .पण नंतर लग्न करणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं.

विशेष म्हणजे प्रतिभासह अफेअर असताना नदीम आधीच विवाहीत होते.दोघांचे ब्रेकअप झाले, प्रतिभा काही काळ नैराश्येत देखील होती.एकाकी पडलेल्या प्रतिभाचे चंदेरी दुनियेतही मन रमत नव्हते. प्रतिभा गेल्या कित्येक वर्षापासून बॉलिवूडपासून दूर आहे.काळानुसार तिच्या लूकमध्येही बदल झाला आहे.आता तिला ओळखणेही कठीण आहे. इंटरनेटवर तिचे काही जुने फोटो पाहायला मिळतात. तिच्या खासगी आयुष्याविषयी फारशी माहिती समोर येत नाही. 

टॅग्स :आमिर खान