Join us
Daily Top 2Weekly Top 5

​राहुल बोसच्या दिग्दर्शनातील ‘पूर्णा’चा ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2017 19:31 IST

पूर्णा मलावथ हिने २५ मे २०१४ रोजी एव्हरेस्ट सर केले होतो. त्यावरच हा चित्रपट बेतलेला आहे.

अभिनेता ते दिग्दर्शक असा प्रवास करणारा राहुल बोस दिग्दर्शित पूर्णा मलावथ हिच्यावर आधारित बायोपिक ‘पूर्णा’चे ट्रेलर रिलीज करण्यात आले आहे. पूणार्ने १३ व्या वर्षी जगातील सर्वांत उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट सर केले होते. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे मोशन टीझर रिलीज करण्यात आले होते.  या चित्रपटाचा मोशन टीझर रिलीज करताना राहुल बोसने ‘मला आताही विश्वास बसत नाही की, १३ वर्षीय आदिवासी मुलीने एव्हरेस्ट सर केल आहे.’ असे लिहले होते. पूर्णा या चित्रपटातून तेलंगना राज्यातील एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न पाहणाºया एका आदिवासी मुलीची कथा सांगण्यात आली आहे. पूर्णा मलावथ हिने २५ मे २०१४ रोजी एव्हरेस्ट सर केले होतो. त्यावरच हा चित्रपट बेतलेला आहे. पूर्णा मलावथ हिच्या कामगिरीवर चित्रपट तयार करण्याची घोषणा मागील वर्षी अभिनेता राहुल बोसने केली होती. या चित्रपटाच्या माध्यमातून राहुल बोसने दिग्दर्शनात पाऊल ठेवले आहे. या चित्रपटात पूर्णा मलावथ हिच्यासह राहुल बोस यांच्या भूमिका आहेत.मालवथ हिच्यावर आधारित चित्रपटाचे पोस्टर दक्षिण आफ्रि केतील सर्वांत उंच शिखर माउंट किलीमंजारो येथून रिलीज करण्यात आले होते. या चित्रपटाच्या सुरुवातीला हा लघुपट असेल अशी चर्चा होती मात्र, यावर राहुल बोसने हा एक संपूर्ण चित्रपट आहे असे सांगून चर्चान विराम दिला होता. पूर्णा तेलंगाणा राज्यातील आदिवासी मुलगी आहे. पूर्णा एव्हरेस्ट सर करण्यापूर्वी कोणत्याच शिखरावर चढली नव्हती. एव्हरेस्ट सर करण्यासाठी तिने १० नेपाळी शेळपाळासोबत तिब्बतेकडील पर्वत रांगातून सुरुवात केली होती. शिखर सर करताना पूणार्ला पॅक्ड फुड व सूप घ्यावे लागले होते.