Join us

​‘हर गली में धोनी’ साँग रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2016 19:52 IST

‘एमएस धोनी: दी अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाचे लेटेस्ट गाणे ‘हर गली में धोनी’ रिलीज करण्यात आले आहे.

भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर आधारित असलेला ‘एमएस धोनी: दी अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाचे लेटेस्ट गाणे ‘हर गली में धोनी’ रिलीज करण्यात आले आहे. हे गाणे भारतातील गल्ली क्रिकेटवर आधारित आहे. क्रिकेटची  पूजा केली जाते, असा भारत हा देश आहे. भारतात सर्वांनाच हे क्रिकेट हा खेळ आवडतो. यामधून धोनीच्या चाहत्यांना एक प्रेरणा मिळते. हे गाणे मनोज मुस्ताशिरने लिहीले असून, कोहलीने गायले आहे. सुशांतसिंग राजपूत यामध्ये धोनीची तर कियारा अडवाणी ही साक्षी धोनीची भूमिका साकारत आहे. नीरज पांडेने या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे. नीरजचा याअगोदरचा ‘रुस्तम’ हा चित्रपटही हिट ठरला होता. धोनीवर आधारित असलेला हा चित्रपट 30 सप्टेंबरला रिलीज होत आहे.">http://