Join us
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : यहां डेंजर जोन है...म्हणत पळत सुटल्या रेखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 15:50 IST

पाहा, मजेशीर व्हिडीओ, जुने आहे कनेक्शन

ठळक मुद्दे रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या अफेअरच्या चर्चा आजही इतक्या वर्षांनंतर चवीने चघळल्या जातात.

बापरे, हा तर डेंजर झोन...! म्हणून पळत सुटल्या रेखाबॉलिवूडचा प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानीच्या कॅलेंडर लॉन्चला बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. बॉलिवूडच्या सदाबहार अभिनेत्री रेखाही यावेळी दिसल्या. या इव्हेंटमधील रेखांचे फोटो व्हायरल झालेत. पण त्याहीपेक्षा तुफान व्हायरल झाला तो रेखांचा एक व्हिडीओ. या मजेदार व्हिडीओवर चाहत्यांच्या कमेंट्स पाऊस पडतोय. व्हिडीओत ‘डेंजर झोन’ म्हणत रेखा पळताना दिसत आहे. आता रेखा का पळत आहेत, हे जाणून घेऊ या...तर त्याचे झाले असे की, डब्बू रत्नीच्या यंदाच्या कॅलेंडर लॉन्चचा सोहळा संपला आणि यानंतर मीडियाला पोज देण्यासाठी रेखा कॅमे-यांसमोर आल्या. रेखा पोज देणार, नेमक्या त्याचवेळी मागच्या भींतीवर टांगलेल्या एका फोटोकडे त्यांचे लक्ष गेले आणि त्याचबरोबर ‘डेंजर झोन’ म्हणून त्या पळत सुटल्या.

रेखांच्या मागे भींतीवर कुणाचा फोटो होता, तर अमिताभ बच्चन यांचा. होय, रेखा ज्या ठिकाणी उभ्या होत्या त्याचठिकाणी मागच्या बाजूला अमिताभ बच्चन यांचा फोटो असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्या बापरे,हा तर डेंजर झोन असे म्हणून तिथून पळत सुटल्या. रेखा यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.गतवर्षीही डब्बू रत्नानी यांच्याच कॅलेंडर लॉन्च इव्हेंटमध्ये रेखांनी मागे अमिताभ यांचा फोटो पाहून काहीसी अशीच प्रतिक्रिया दिली होती. मागच्या वर्षीही रेखा फोटोग्राफर्सला पोज देत असताना त्यांच्या मागे अमिताभ यांचा फोटो होता. फोटोग्राफर्सनी त्यांच्या लक्षात आणून दिल्यावर रेखा यांनी अमिताभ यांचा फोटो पाहून काही विचित्र रिअ‍ॅक्शन दिली होती.

 रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या अफेअरच्या चर्चा आजही इतक्या वर्षांनंतर चवीने चघळल्या जातात. दुसरीकडे रेखा व अमिताभ दोघेही कोणत्याही इव्हेंटमध्ये एकमेकांबद्दल बोलणेच काय तर एकमेकांकडे पाहणेही टाळतात. इतकेच च काय तर चुकून एखाद वेळी समोरासमोर आलेच तर आपला मार्ग बदलतात.

टॅग्स :रेखाअमिताभ बच्चनडब्बू रतनानी