Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video: ...अन् रेखा यांनी पापाराझीच्या गालावर मारली चापट; पुढे काय घडलं पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 11:05 IST

रेखा यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री रेखा यांनी त्यांच्या अभिनयाने ७०-८०चं दशक गाजवलं. ‘संसार’, ‘जानी दुश्मन’, ‘गंगा की सौगंद’, ‘शेषनाग’, ‘अगर तुम ना होते’ असे अनेक सुपरहिट सिनेमे त्यांनी बॉलिवूडला दिले. रेखा यांच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. आजही ६८ वर्षांच्या रेखा त्यांच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करतात. त्यांची एक झलक पाहण्यासाठीही चाहते उत्सुक असतात. सध्या रेखा यांचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रेखा यांनी बुधवारी(१३ सप्टेंबर) मुंबईतील ग्लोबल स्पा अवॉर्ड सोहळ्याला हजेरी लावली होती. या सोहळ्यासाठी रेखा यांनी खास लूक केला होता. या अवॉर्डसोहळ्यादरम्यानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. इन्स्टंट बॉलिवूड या पापाराझी पेजवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत पापाराझी रेखा यांच्याबरोबर फोटो काढताना दिसत आहे. फोटो काढून झाल्यानंतर रेखा यांनी पापाराझीच्या गालावर लाडाने चापट मारली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. रेखा यांनी गालावर मारल्यानंतर पापाराझी खूश झाल्याचं व्हिडिओत दिसत आहे.

या व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एकाने कमेंट करत “हा तर खूश झाला” असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने  “ही किती प्रेमळ आहे” अशी कमेंट केली आहे. दरम्यान, रेखा सध्या चित्रपटांत दिसत नसल्या तरी त्या अनेक अवॉर्ड सोहळे आणि इव्हेंटला हजेरी लावतात.

टॅग्स :रेखासेलिब्रिटी