थलैवासाठी रहमानने रचले गाणे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2016 16:41 IST
रजनीकांत, संगीतकार ए. आर. रहमान, अक्षय कुमार ही नावं त्यांच्या क्षेत्रात अत्यंत मोठी आहेत. हे तिघे चित्रपटासाठी एकत्र आले ...
थलैवासाठी रहमानने रचले गाणे...
रजनीकांत, संगीतकार ए. आर. रहमान, अक्षय कुमार ही नावं त्यांच्या क्षेत्रात अत्यंत मोठी आहेत. हे तिघे चित्रपटासाठी एकत्र आले हे स्वप्नवत वाटतेय का? वाटत असले तरीही हे स्वप्न नव्हे सत्य आहे. ‘२.०’ या अॅक्शन थ्रिलरपटासाठी हे तिघेही एकत्र आले आहेत. ‘रोबोट’चा सिक्वेल हा चित्रपट असेल. चित्रपटासाठी एकच गाणे असून, ते तामिळनाडू येथे शूट करण्यात आले आहे. संगीतकार ए.आर.रहमान यांनी ते संगीतबद्ध केले आहे. गमतीची बाब अशी आहे की, ‘रोबोट’ चित्रपटात तब्बल सात गाणी आहेत. मात्र, ‘२.०’ मध्ये एकच गाणे असणार आहे. पण सूत्रांनुसार, दिग्दर्शक शंकर यांना वाटत होते की, रहमान यांनी चित्रपटातील बॅकग्राऊंड संगीतावर लक्ष द्यावे. म्हणून त्यांनी गाण्यांबद्दल अट्टाहास केला नाही. २०१७ वर्षाच्या शेवटी चित्रपट रिलीज होणार असून, तोपर्यंत वाटले आणि कथानकानुसार जर गरज असेल तर काही गाणी नक्कीच बनवता येतील, असे त्यांना वाटले. चित्रपटाच्या फर्स्ट लूकलाँचिंगवेळी रहमान गमतीने म्हणाले, ‘शंकरला मी बॅकग्राऊंड म्युझिकसह बरंच काही देऊ केलं पण, त्याला केवळ थीम संगीतच आवडलं, हे बरंच झालं.’ ए.आर. रहमान यांच्या संगीताचा चाहता कोण नसेल? मधाळ संगीताने मनात घुटमळणारे स्वर त्यांच्याच संगीतातून उमटतात. बॉलिवूडच्या अख्ख्या इंडस्ट्रीसह कोट्यवधी चाहत्यांना त्यांचे गायन, संगीत अक्षरश: भुरळ पाडते. प्रादेशिक भाषांच्या परिसीमा ओलांडून त्यांचे संगीत सातासमुद्रापार पोहोचले आहे. अशा संगीतकाराच्या पदरी थलैवासाठी केवळ एकच गाणं पडावं, हे काही रूचत नाही. पाहूयात, दिग्दर्शक गाण्यांच्या संख्येत भर घालतो की नाही ते...