Join us

‘या’ बालकलाकारांची एंट्री ठरली रेकॉर्डब्रेक; एकाच्या चित्रपटाने तर कमाविले २३०० कोटी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 15:57 IST

चित्रपटांमध्ये भलेही अभिनेते आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर छाप पाडत असले तरी, काही कलाकार असेही आहेत ज्यांनी चित्रपटातील अभिनेत्यांपेक्षा हटके भूमिका ...

चित्रपटांमध्ये भलेही अभिनेते आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर छाप पाडत असले तरी, काही कलाकार असेही आहेत ज्यांनी चित्रपटातील अभिनेत्यांपेक्षा हटके भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली. होय, आम्ही त्या बालकलाकारांविषयी सांगत आहोत, जे केवळ चित्रपटाचा केंद्रबिंदूच ठरले नाहीत तर त्यांनी प्रेक्षकांवर अशी काही जादू केली की, पहिल्यांच चित्रपटातून त्यांनी यशाला गवसनी घातली. त्याचाच आढावा घेणारा हा वृत्तांत...जायरा वसीम‘दंगल गर्ल’ नावाने लोकप्रिय असलेली अभिनेत्री जायरा वसीमने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर उमेदीच्या काळातच बॉक्स आॅफिसवर कमाईचे रेकॉर्ड केले. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. या चित्रपटात तिने गीता फोगाटची भूमिका साकारली होती. आमिर खानची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात जायराच्याही भूमिकेचे चांगलेच कौतुक केले गेले. चित्रपटाने वर्ल्डवाइड २३०० कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर जायरा ‘सीक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटात बघावयास मिळाली. या चित्रपटानेही रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. हर्षाली मल्होत्रासुपरस्टार सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटात मुन्नीची प्रमुख भूमिका साकारणारी बालकलाकार हर्षाली मल्होत्रा हिचा डेब्यूदेखील बॉक्स आॅफिसवर धमाकेदार राहिला आहे. १० वर्षीय हर्षालीने चित्रपटात पाकिस्तानी मुलीची भूमिका साकारली. प्रेक्षकांना तिचा अभिनय एवढा भावला की, चित्रपटाला सुपरहिटचा मान मिळवून दिला. या चित्रपटाने कमाईचे अनेक रेकॉर्ड प्रस्थापित केले. दर्शील सफारी२००७ मध्ये आलेला आमिर खानचा ‘तारे जमीन पर’ हा चित्रपट अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. चित्रपटात आमिरसोबत दर्शील सफारी हा बालकलाकार मुख्य भूमिकेत बघावयास मिळाला. त्यावेळी जेव्हा दर्शीलने या चित्रपटात अभिनय केला तेव्हा त्याचे वय केवळ दहा वर्ष इतके होते. या चित्रपटात त्याने जबरदस्त अभिनय केला होता. प्रेक्षकांना दर्शीलचा अभिनय खूपच भावला होता.