Join us

‘बागी ३’ चित्रपटाचा विक्रम; ट्रेलर सोशल मीडियावर ठरला सुपरहिट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 16:34 IST

टायगर श्रॉफच्या ‘बागी ३’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. धमाकेदार अ‍ॅक्शन सीन्सने भरलेला हा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. 

बॉलिवूडची हॉट जोडी अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडतेच. ‘बागी’ चित्रपटातील त्यांच्या बाँण्डिंगला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. यादरम्यान टायगर-श्रद्धा चर्चेत होते. त्यानंतर टायगरचे नाव अभिनेत्री दिशा पटानीसोबत जोडले गेले. आता पुन्हा एकदा हीच हॉट आणि रोमँटिक जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. टायगर श्रॉफच्या ‘बागी ३’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. धमाकेदार अ‍ॅक्शन सीन्सने भरलेला हा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. 

खरंतर, आश्चर्याची बाब म्हणजे गेल्या ७२ तासांत ‘बागी ३’चा ट्रेलर सर्व ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मिळून तब्बल १० कोटी वेळा पाहिला गेला आहे. भारतीय इतिहासात आजवर कुठल्याही चित्रपटाचा ट्रेलर इंटरनेटवर इतक्या मोठ्या प्रमाणावर पाहिला गेला नव्हता. गंमतीशीर बाब म्हणजे केवळ युट्यूबवरच गेल्या २४ तासांत पाच कोटी वेळा हा ट्रेलर पाहिला गेला. यावरुन आपल्याला या चित्रपटाबाबत प्रेक्षक किती उत्सुक आहेत याचा अंदाज येतो. या अफाट प्रेमासाठी टायगर श्रॉफने ट्विट करुन सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत.

‘बागी’ हा चित्रपट २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात श्रद्धा कपूर आणि टायगर मुख्य भूमिकेत होते. तसेच चित्रपटाचे दिग्दर्शन सब्बीर खानने केले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. त्यानंतर मार्च २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बागी २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २५३ कोटींची कमाई केली होती. या भागात दिशा पटाणी आणि टायगर मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटालाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे साहजिकच टायगरच्या आगामी ‘बागी ३’कडूनही प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. ‘बागी ३’ मध्ये पुन्हा श्रद्धा आणि टायगरची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.  

टॅग्स :टायगर श्रॉफश्रद्धा कपूरबॉलिवूड