‘बागी2’ येणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2016 19:51 IST
साबीर खान दिग्दर्शित ‘बागी- अ रिबेल फॉर लव्ह’ या चित्रपटानंतर टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर यांची जोडी पुन्हा एकदा ...
‘बागी2’ येणार!
साबीर खान दिग्दर्शित ‘बागी- अ रिबेल फॉर लव्ह’ या चित्रपटानंतर टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर यांची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. होय, निर्माते साजीद नाडियाडवाला ‘बागी’चा सिक्वेल घेऊन येत आहेत. या सिक्वेलमध्येही टायगर आणि श्रद्धा ही हॉट जोडी लीड रोलमध्ये दिसणार आहे. या सिक्वेल जबाबदारी साजीद यांनी पुन्हा एकदा साबीर खान यांच्याकडेच सोपवली आहे. पुढील वर्षी जानेवारीत शांघायमध्ये ‘बागी२’ ची शूटींग सुरु होईल. सध्या तरी साबीर खान ‘मुन्ना मायकल’ या रोमॅन्टिक अॅक्शनपटात बिझी आहेत. टायगर हाच या मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाची शूटींग येत्या सप्टेंबरमध्ये सुरु होणार आहे.