Join us

करोडो रूपये कमावणारा सलमान खान आजही का राहतो वन बीएचके फ्लॅटमध्ये,वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 13:15 IST

असूनही सलमान कोणत्याही मोठ्या बंगल्यात न राहाता वांद्रे येथील गॅलेक्सी अर्पाटमेंटमधील एका फ्लॅटमध्ये राहातो.

सलमान खानला बॉलिवूडचा दबंग खान म्हटले जाते. सलमान एका चित्रपटासाठी करोडो रुपये घेतो. आज बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त पैसे घेणाऱ्या कलाकारांमध्ये त्याचे नाव घेतले जाते. पण असे असूनही सलमान कोणत्याही मोठ्या बंगल्यात न राहाता वांद्रे येथील गॅलेक्सी अर्पाटमेंटमधील एका फ्लॅटमध्ये राहातो. 

 

सलमान बंगल्यात न राहात फ्लॅटमध्ये का राहातो याविषयी त्यानेच एका चॅट शोमध्ये सांगितले होते. तो म्हणाला होता की, मी माझ्या आई-वडिलांसोबत राहू इच्छितो. त्यांना सोडून मी कुठल्याही बंगल्यात शिफ्ट होणार नाही. एखाद्या मोठ्या अलिशान बंगल्यापेक्षा हा फ्लॅट मला प्रिय आहे. कारण याठिकाणी माझे आई-बाबा राहतात. मी लहानपणापासून याठिकाणी राहिलो आहे. या अपार्टमेंटमधील सगळी माणसं मला माझ्या कुटुंबासारखी आहेत. आम्ही लहान होतो तेव्हा खालच्या गार्डनमध्ये तासन् तास खेळायचो. अनेकदा तर थकून गार्डनमध्येच झोपायचो. आमच्यासाठी अपार्टमेंटमधील सगळी घरे आमचीच घरे होती. कोणाच्याही घरात जायचो. जेवायचो, खेळायचो. गॅलेक्सी अपार्टमेंटशी माझ्या अनेक आठवणी जुळल्या आहेत. हे घर सोडून मला कुठेच जायचे नाही. मी कायम इथेच राहू इच्छितो.

 

सलमानचे गॅलेक्सीमधील घर देखील शानदार आहे. या अर्पाटमेंटमध्ये त्यांची दोन घरं असून एक घर ग्राऊंड फ्लोअरवर तर दुसरे फर्स्ट फ्लोअरवर आहे. सलमानचे आई वडील सलीम खान आणि सलमा खान पहिल्या मजल्यावर राहतात. सलमानचे घर हे वन बीएचके असून यात एक छोटेसे किचन देखील आहे. हा फ्लॅट एल शेपमध्ये असून यातील बेडरूम १७० ते १९० सक्वेअर फूट इतकेच आहे.सलमानचे वांद्रेतील घर छोटे असले तरी सलमानचे पनवेलमधील फार्म हाऊस हे भले मोठे आहे. तो अनेकवेळा तिथे राहायला जातो. 

टॅग्स :सलमान खान