Join us  

या कारणामुळे सोनू सूद चीनमध्येही आहे लोकप्रिय, असे आहे त्याचे चायना कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 12:41 PM

जॅकी चॅनही सोनूच्या विनंतीने २०१७ मध्ये एका दिवसासाठी भारतात आले होते. चीनमध्येही सोनू लोकप्रिय आहे.

कोरोनव्हायरस आणि लॉकडाऊनच्या या संकटाच्या काळात अनेक मदत कार्यात कोट्याधी रुपयांची देणगी देत सेलिब्रेटी चर्चेत आहेत. करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे देशभरातील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत अनेक सेलिब्रिटींनी मदतीचा हात पुढे केला आहे. यामध्ये अभिनेता सोनू सूद फारच चर्चेत आहे. मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्याची जबाबदारी त्याने स्वीकारली आहे. त्याच्या या कामाचे प्रचंड कौतुक केले जात आहे. सोनू सूदची चर्चाही ही भारतातच होत नसून चीनमध्येही होत आहे. सोनू सूदचा चाहता वर्ग हा भारताप्रमाणे चीनमध्येही आहे. म्हणूनच तर कोरोनाकाळात कोरोना आणि सोनू सूद हे दोन नावं सध्या तुफान चर्चेत आहेत. 

चीनमध्ये सोनू सूदचा चाहता वर्ग कसा आणि नेमके चीनी लोकांमध्ये तो इतका फेमस आहे हे जरा आश्चर्यदायकच असेल. पण हे खरे आहे. २०१७ च्या ‘कुंग फू’ योगा या सिनेमात सोनूने अभिनय केला आहे. या सिनेमातील सोनू सूदच्या भूमिकेचेही विशेष कौतुक झाले होते. हा सिनेमा चीन शिवाय भारतातही प्रदर्शित झाला होता. या सिनेमासाठी सोनूने खूप मेहनत घेतलो होती.

यासाठी त्याने चीनमध्ये बीजिंगमघ्ये राहून जॅकी चॅनच्या मुलासोबत सात महिने प्रशिक्षण घेतले होते. ‘कुंग फू’ सिनेमाचे भारतातील प्रमोशन सोनूनेच केले होते. जॅकी चॅनही सोनूच्या विनंतीने २०१७ मध्ये एका दिवसासाठी भारतात आले होते. चीनमध्येही सोनू लोकप्रिय आहे.

सोनू पंजाबमधील मोगा जिल्ह्यातील आहे. त्याची आई सरोज प्रोफेसर होत्या. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या गरीब मुलांना शिकवायच्या. वडील शक्तीसागर यांचे कपड्यांचे एक मोठे शोरूम होते, जे आज सोनू कर्मचा-यांच्या मदतीने चालवतो.

टॅग्स :सोनू सूदकोरोना वायरस बातम्या