Join us  

या कारणामुळे सोहा अली खान राहिली बॉलिवूडपासून दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2017 7:57 AM

सोहा अली खान आपल्या आई-वडिलांनी आपल्याला अभिनयातील करिअरसाठी कधी प्रोत्साहान दिले नसल्याचे एक मुलाखती दरम्यान म्हटले. तसेच त्यांनी मला ...

सोहा अली खान आपल्या आई-वडिलांनी आपल्याला अभिनयातील करिअरसाठी कधी प्रोत्साहान दिले नसल्याचे एक मुलाखती दरम्यान म्हटले. तसेच त्यांनी मला कधी अभिनय करु नकोस असे देखील सांगितले नाही.   सोहा सध्या लंडनमध्ये राहून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतून इकोनॉमिक्स आणि पोलिटिकल सायन्समधून  मास्टर डिग्रीचे शिक्षण घेत आहे. सोहा दिग्गज अभिनेत्री शर्मिला टागोर आणि दिवंगत मंसूर अली खान पटौदी यांची धाकटी कन्या आहे. सोहाने म्हटले जेव्हा अभिनयात करिअर हा विषय आला त्यावेळी मला प्रोत्साहित केले गेले नाही माझे व्यक्तिमत्त्व कलाकार म्हणून नाही याची जाणीव माझ्या आई-वडिलांना झाली म्हणून त्यांची इच्छा होती या चित्रपटातील स्पर्धेपासून मी सुरक्षित रहावे.  सोहा पुढे म्हणाली, ''माझ्या आई-वडिलांची पहिल्यापासून इच्छा होती की मी एक स्थिर क्षेत्र करिअर म्हणून निवडावे. मी काही काळ बँकिंग क्षेत्रात कामदेखील केले. या गोष्टीचा सर्वात जास्त गर्व माझ्या वडिलांना होता. मी काही दिवस बँकेत काम केल्यावर माझ्या लक्षात आले मी फार काळ इथं रमू शकत नाही. मग मी चित्रपटात काम करायसा सुरुवात केली हा निर्णय घेणं माझ्यासाठी कठिण होता. मात्र मला खात्री होती माझे कुटुंबीय यातही मला साथ देतील. ALSO READ :  अबब... नणंदच्या बायोग्राफी लॉन्च कार्यक्रमात करिना कपूरने एवढ्या किमतीचा परिधान केला ड्रेस!सोहाने लिहिलेल्या ‘ द पेरिल्स आॅफ बीर्इंग मॉडरेटली फेमस’ या पुस्तकाचे प्रकाशन पार पडले. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात करिनाशिवाय सोहाचा पती कुणाल खेमू, आई शर्मिला टागौर, भाऊ सैफ अली खान, बहीण सबा अली खान असे सगळे हजर होते. यावेळी करिना सोहाबद्दल भरभरून बोलली. मी खान कुटुंबातील कुणामुळे सर्वाधिक प्रभावित झाली असेल तर ती सोहा आहे. शर्मिला टागौर यांच्या अनुपस्थित केवळ सोहा ही एकटीच घर सांभाळू शकते. आम्ही सहकुटुंब एकत्र असलो की, सोहा आणि सैफ यांच्या गोष्टी मला अजिबात कळत नाही. मी सोहासोबत केवळ शॉपिंगसंदर्भात बोलू शकते किंवा गॉसिप्स करू शकते. पण यातही मी सोहापेक्षा बरीच मागे आहे, याची जाणीव मला होते, असे करिना म्हणाली.