Join us
Daily Top 2Weekly Top 5

या कारणामुळे लेकीने बॉलिवुडमध्ये पाऊल ठेवू नये असं मुन्नाभाई संजय दत्तला वाटतं,परदेशात करते हे काम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 14:52 IST

बॉलिवूडचा मुन्नाभाई संजय दत्तच्या जीवनाचं वास्तव रुपेरी पडद्यावर मांडणारा 'संजू' या सिनेमाचा टीझर नुकताच रसिकांच्या भेटीला आला. राजकुमार हिरानी ...

बॉलिवूडचा मुन्नाभाई संजय दत्तच्या जीवनाचं वास्तव रुपेरी पडद्यावर मांडणारा 'संजू' या सिनेमाचा टीझर नुकताच रसिकांच्या भेटीला आला.राजकुमार हिरानी दिग्दर्शित या सिनेमातून संजय दत्तचा जीवनसंघर्ष रुपेरी पडद्यावर दाखवला जाणार आहे.अभिनेता रणबीर कपूरने साकारलेला संजय दत्त भलताच भाव खाऊन जात आहे.टीझरमध्ये संजय दत्तची विविध रुपं दाखवली असून सिनेमाबाबतची उत्सुकता वाढवण्यात टीझर यशस्वी ठरला आहे.संजय दत्तच्या 308 गर्लफ्रेंड्सपासून ते येरवडा जेलमधील कारावास अशा सगळ्या गोष्टी या सिनेमात असतील.संजय दत्तच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट या सिनेमात रसिकांना पाहायला मिळणार आहे.कौटुंबिक जीवन, आई-वडिल, बहिण, पत्नी आणि मुलंही या सिनेमात पाहायला मिळतील.संजय दत्त सध्या मुंबईत आपली तिसरी पत्नी मान्यता, मुलगी इकरा आणि मुलगा शहरानसोबत राहतो. संजय दत्तची आणखी एक लेक आहे.तिचे नाव त्रिशाला असून ती न्यूयॉर्कमध्ये आपल्या मावशीसोबत राहते.संजय दत्त आणि त्याची पहिली पत्नी रिचा शर्मा यांची त्रिशाला ही लेक आहे.सध्या ती फॅशन जगतात नशीब आजमावत आहे. 2014 साली त्रिशालाने पहिली ड्रीम ट्रेसेस हेअर एक्स्टेन्शन लाईन सुरु केली. न्यूयॉर्कच्या जॉन जे कॉलेजमधून तिने क्रिमिनल जस्टिस या विषयातून कायद्याची पदवीसुद्धा मिळवली आहे.त्रिशालाने सिनेमात कधीही काम करु नये ही आपली इच्छा आहे असं संजय दत्तने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.यापेक्षा तिने शालेय शिक्षण आणि कॉलेज शिक्षण पूर्ण करुन वेगळ्या क्षेत्रात करिअर करावं अशी संजय दत्तची इच्छा आहे.सिनेमात येण्यासाठी बॉलिवूडची समज, इथल्या वातावरणाशी जुळवून घेणे गरजेचे असते. हे ग्लॅमरचे जग आहे, मात्र इथे टिकून राहणं कठीण काम आहे असं संजय दत्तने म्हटले होते.संजय दत्तने 1987 साली रिचा शर्मासह लग्न केलं. 1988 साली संजय आणि रिचाच्या आयुष्यात त्रिशाला आली.मात्र रिचाला मेंदूचा ट्युमर होता.त्यामुळे 10 डिसेंबर 1996 रोजी रिचाचा मृत्यू झाला. तेव्हापासून त्रिशाला न्यूयॉर्कमध्ये आपल्या मावशीकडेच राहते.