Join us  

धक्कादायक! या बॉलीवूड अभिनेत्याच्या करिअरची लागली वाट, बायकोनेही सोडली साथ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 5:13 PM

दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्याने सोशल मीडियावर खळबळ उडवली

अभिनेता इमरान खान गेल्या मे महिन्यापासून अचानक प्रकाशझोतात आला आहे. ज्यावेळी इमरानची पत्नी अवंतिका त्याचे घर सोडून बाहेर पडली. दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्याने सोशल मीडियावर खळबळ उडवली. मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी या बातम्यांचे खंडन केले. अवंतिका सध्या मुलीला घेऊन आपल्या माहेरी राहतेय. 

पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, इमरानला अभिनयात फारसे यश मिळाले नाही. 2015 मध्ये आलेला 'कट्टी-बट्टी' फ्लॉप झाल्यावर त्याला सिनेमाच्या ऑफर्स येणं बंद झाले. गेल्या चार वर्षांपासून इमरान घरी बसलेला आहे. अभिनयात अपयश मिळाल्यानंतर इमरानने दिग्दर्शनात नशीब आजमावण्याचा देखील प्रयत्न केला मात्र तिथे ही त्याच्या पदरी अपयशचं आले.  

अपयशामुळे इमरान खानचे वागणं बदलले. तो दिवसंदिवस चिडचिड करु लागला आणि छोट्या-मोठ्या गोष्टींवर रिएक्ट करु लागला. त्याची आर्थिक परिस्थिती बिकट झाली अशात अवंतिकाने तिच्या माहेरी मदत मागितली. दोघांमध्ये रोज भांडणं होऊ लागली. अवंतिकाला वाटले आपल्या भांडणांचा परिणाम मुलीवर होऊ लागला आहे. तिने आपल्या कुटुंबीयांना ही गोष्ट सांगितली.  

इमरान आणि अवंतिकाने आपलं नातं पूर्वीसारखे होण्यासाठी बरेच प्रयत्न केले मात्र ते अयशस्वी झाले. दोघांनी मिळून हा विचार केला की आपल्या नात्याला थोडा वेळ देण्याचा निर्णय घेतला आणि अवंतिका मुलीला घेऊन आईच्या घरी आली. दोघांनी अद्याप घटस्फोटासाठी अर्ज केलेला नाही मात्र मे महिन्यापासून अवंतिका आपल्या माहेरीच राहते आहे. 

टॅग्स :इमरान खान