Join us

आमिर खान आणि किरण राव यांच्या १५ वर्षांचा संसार मोडण्यामागचे कारण आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 16:20 IST

आमिर खान आणि किरण राव यांनी लग्नाच्या १५ वर्षानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव हे दोघे बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडीपैकी एक होते. मात्र आता त्यांनी १५ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्या दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत वेगळे होत असल्याची माहिती दिली होती. त्यांची ही पोस्ट पाहून अनेकांना धक्का बसला होता. त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय का घेतला हे त्यांच्या चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे. 

फ्री प्रेस जर्नलच्या रिपोर्टनुसार, २०१९ मध्ये आमिर आणि किरण दोघेही भावनिकदृष्ट्या वेगळे झाले आहेत. बॉलिवूड इनसाइडरने दिलेल्या रिपोर्टनुसार,लग्न आणि घटस्फोट या दोन्ही गोष्टी आमिरसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. तर आमिर आणि फातिमा लग्न करणार या निव्वळ अफवा आहेत.

आमिर आणि किरण हे दोघेही गेल्या काही वर्षात लग्न या संकल्पनेच्या खूप पुढे निघून गेले होते. त्यांच्यात कोणतेच मतभेद नव्हते. दोघांचे विचार आणि मूल्य एकसारखीच असली तरी त्यांच्या गरजा, आवडीनिवडी, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्यांची मते ही काळानुसार बदलत गेली. त्यात मग प्रेमही होते आणि लग्नही. त्यामुळे केवळ फ्रेंड्स म्हणून राहू शकतो, या निर्णयाप्रत ते दोघेही आले होते.

या रिपोर्ट्समध्ये पुढे लिहिण्यात आले आहे की, आयुष्याच्या त्या टप्प्यावर वैवाहिक जीवनात काही समस्या असतील. तर एकत्र राहण्यापेक्षा वेगळे राहणे अधिक चांगले आहे. २०१९ मध्ये भावनिकरित्या विभक्त झाल्यानंतर अखेर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आणि या सगळ्या प्रक्रियेला २ वर्ष लागली.

टॅग्स :आमिर खानकिरण राव