या कारणामुळे अमिताभ बच्चन करणार नाही सलमान खानसोबत काम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2017 14:15 IST
यात काही वाद नाही की सलमान खानचा आगामी चित्रपट 'रेस3' बॉक्स ऑफिसवर धमाका उडवून देणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ...
या कारणामुळे अमिताभ बच्चन करणार नाही सलमान खानसोबत काम!
यात काही वाद नाही की सलमान खानचा आगामी चित्रपट 'रेस3' बॉक्स ऑफिसवर धमाका उडवून देणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन यांची एंट्री होणार होती. होय, तुम्ही बरोबर वाचलात आम्ही आमिताभ बच्चन यांच्याबद्दलच बोलतो आहे. 'रेस3' च्या टीमने अमिताभ बच्चन यांना सलमान खानच्या अपोझिट मुख्य भूमिकेसाठी विचारले होते. मात्र बिग बींनी ही ऑफर नाकारली. अमिताभ बच्चन यांना सलमान खानसोबत काम करण्याची इच्छा होती मात्र त्यांच्याकडे त्यासाठी वेळ नाही आहे. अमिताभ बच्चन यांनी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांच्या तारखा आगामी 'झुण्ड' चित्रपटासाठी दिल्या आहेत. त्यामुळे त्यांनी सलमानला नाही म्हटले आहे. झुण्ड हा एक बायोपिक आहे. तसेच ते आमीर खानसोबत ठ्ग्स ऑफ हिंदुस्तानमध्ये सुद्धा दिसणार आहेत. अमिताभ यांनी 'रेस 3'ला नकार दिल्यानंतर हा चित्रपट आदित्य पंचोलीच्या झोळीत पडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आदित्य पंचोली या चित्रपटात व्हिलनच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय जॅकलिन, सिद्धार्थ मल्होत्रा, आदित्य रॉय कपूर, डेजी शहा यांचे नाव फायनल करण्यात आले आहे. ALSO RAED : कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर अमिताभ बच्चन का झाले भावूक?सलमान खान आणि कॅटरिना कैफच्या जोडीचा टायगर जिंदा है ख्रिसमध्ये रिलीज होणार आहे. काही दिवसांपूर्वीच सलमानने या चित्रपटाची शूटिंग आबुधाबीमध्ये पूर्ण केली आहे. हा एक था टायगरला सीक्वल आहे. कॅटरिना आणि सलमानचे ब्रेकअप झाल्यानंतर त्यांचा हा पहिला चित्रपट आहे. तब्बल पाच वर्षांनंतर दोघांची केमिस्ट्री पाहण्यासाठी त्याचे फॅन्स उत्सुक आहेत. कॅटरिना आणि सलमानचे मागचे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले होते. सलमान खानचा कबीर खान दिग्दर्शित ट्यूबलाईट चित्रपट चांगलाच आपटला होता. या चित्रपटाकडून सलमानला खूप अपेक्षा होत्या. मात्र चित्रपट फ्लॉप झाले तरी याचा काहीही असर सलमानवर झाला नाही. सलमानकडे चित्रपटांची रिघ लागली होती. तर रणबीर कपूरसोबत आलेला जग्गा जासूसला प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही. त्यामुळे सलमान प्रमाणे कॅटरिना ही एक हिटच्या शोधात आहे. सलमान आणि कॅटरिनाच्या जोडीचा 'टायगर जिंदा है' कडून दोघांना ही खूप अपेक्षा आहेत.