Join us

या कारणामुळे अजय देवगण आहे मुलिन लूथरियावर नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 14:25 IST

सिंघम स्टार अजय देवगण फक्त त्याच्या कॉमेडी चित्रपटासाठी नाही तर त्याच्या रागासाठी ही ओळखला जातो. आजकाल अजय देवगण फिल्म ...

सिंघम स्टार अजय देवगण फक्त त्याच्या कॉमेडी चित्रपटासाठी नाही तर त्याच्या रागासाठी ही ओळखला जातो. आजकाल अजय देवगण फिल्म मेकर मुलिन लूथरियावर नाराज आहे.   अजय देवगणचा चित्रपट गोलमाल अगेन दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार. सध्या अजय देवगण त्याचा चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पण सध्या चर्चा आहे की अजय बादशाहोचा दिग्दर्शक मिलन लूथरियावर नाराज आहे. या नाराजी मागचे कारण आहे बादशाहो. होय तुम्ही बरोबर वाचलात बादशाहोमुळेच अजय मिलन लूथरिया नाराज आहे.     बॉलिवूड लाइफच्या रिपोर्टनुसार बादशाहोच्या क्लाइमैक्सला घेऊन अजय देवगण नाराज आहे. बादशाहोच्या धील्या क्लाइमैक्सला घेऊन अजय खूश नव्हता. मात्र तरीही मिलन या क्लाइमैक्समध्ये जीव नाही आणू शकला. त्यामुळे मल्टी स्टारकास्ट असताना ही बॉक्स ऑफिसवर बादशाहो टिकू शकला नाही. बादशाहोच्या ट्रेलरमध्ये धमाकेदार एक्शन असणार असे त्याला सांगण्यात आले होते. मात्र यानंतर ही चित्रपटात फारसा दम दिसला नाही. हा चित्रपट 100 कोटींचा बिझनेस करले अशी आशा अजयला होती मात्र या चित्रपटाने केवळ 78 कोटींचा गल्ला जमावला.   बादशाहोचे पहिले गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. ट्रेलरला ही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. मात्र तरीही चित्रपटाला अपेक्षित यश मिळवता आले नाही. त्यामुळे अजय देवगण चित्रपटाच्या दिग्दर्शकावर नाराज आहे.    दिवाळी अजयसाठी खूप खास आहे. एकिकडे अजय देवगणचा गोलमाल अगेन रिलीज होतो आहे तर दिवाळीच्या सुट्टीसाठी अजयची मुलगी घरी येणार आहे. नुकताच बॉलिवूडलाईफला गोलमाल अगेनच्या निमित्ताने दिलेल्या इंटरव्ह्यु दरम्यान अजय म्हणाला की, या दिवाळीत मला डब्बल आनंद मिळणार आहे. एकाकडे माझा चित्रपट रिलीज होतोय तर दुसरीकडे माझी मुलगी न्यासा सिंगापूरवरुन परत येते आहे. काही दिवसांपूर्वी शिक्षणासाठी ती परदेशात गेली आहे. दिवाळीच्या मुहुर्तावर सगळ्या कुटुंबीयासोबत सेलिब्रेशन करायला ती येते आहे. अजय आपल्या मुली बाबत नेहमीच खूप प्रोटेक्टिव्ह दिसला आहे. ऐवढचे नाहीत तर अजयच्या सगळ्या चित्रपटांची त्यांची मुलगीच पहिली क्रिटिक्स असते.