या कारणामुळे करोडोचा बंगला सोडून आदित्य चोप्रा राहायचा हॉटेलमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2018 16:04 IST
यश राज फिल्म्सने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. यश चोप्रा यांच्या दिग्दर्शनाचे कौतुक आजही केले जाते. यश चोप्रा ...
या कारणामुळे करोडोचा बंगला सोडून आदित्य चोप्रा राहायचा हॉटेलमध्ये
यश राज फिल्म्सने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. यश चोप्रा यांच्या दिग्दर्शनाचे कौतुक आजही केले जाते. यश चोप्रा यांच्या नंतर त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून त्यांचा मुलगा आदित्य बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आला. आदित्यने देखील आजवर अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला मिळवून दिले आहेत. त्याच्या दिलवाले दुल्हनिया ये जाएंगे या चित्रपटाची आज बॉलिवूडमधील सगळ्यात चांगल्या चित्रपटांमध्ये तुलना केली जाते. चोप्रा बॅनरचा आज आदित्य सर्वेसर्वा आहे. आदित्य आज बॉलिवूडमधील आघाडीचा निर्माता, दिग्दर्शक असला तरी तो नेहमीच लाइमलाइटपासून दूर राहाणेच पसंत करतो. आदित्य चोप्राने २०१४ मध्ये राणी मुखर्जीसोबत लग्न केले आणि त्यामुळे मीडियात त्याच्या नावाची जास्तच चर्चा होऊ लागली.राणी मुखर्जीसोबत लग्न करण्याआधी आदित्यचे पहिले लग्न झालेले होते. त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव पायल असून ती एका बड्या उद्योगपतीची मुलगी आहे. आदित्यला आपले वैयक्तिक आयुष्य लोकांसोबत शेअर करायला आवडत नाही. त्यामुळे तो कधी मुलाखतींमध्ये देखील आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलणे टाळतो. आदित्य आणि राणीच्या लग्नाच्या काही वर्षं आधीपासूनच त्यांच्या नात्याची चर्चा मीडियात होत होती. आदित्यने पायलसोबत घटस्फोट घेण्याचे ठरवल्यावर ती गोष्ट चोप्रा कुटुंबाला अजिबातच आवडली नव्हती. पायल ही यश चोप्रा यांच्या मित्राची मुलगी असल्याने त्यांच्यासाठी हा निर्णय खूपच अवघड होता. पायलसोबत आदित्यने विभक्त होऊ नये असे यश चोप्रा आणि त्यांची पत्नी पॅमेला वाटत होते. त्यामुळे ते दोघे पायलच्या पाठिशी खंबीरपणे उभे होते. या कारणाने आदित्य कित्येक महिने चोप्रा कुटुंबियांसोबत बंगल्यात न राहाता मुंबईतील हॉटेलमध्ये राहात होता. पण अखेरीस मुलाच्या हट्टापुढे यश चोप्रा यांना झुकावे लागले आणि आदित्य आणि राणी मुखर्जी यांच्या नात्याला त्यांनी होकार दिला. राणी मुखर्जीच्या प्रेमात पडल्यामुळेच आदित्य चोप्राने पायलशी घटस्फोट घेतला असे म्हटले जात असले तरी पायलसोबत घटस्फोट झाल्यानंतरच मी आदित्यच्या आयुष्यात आली असे राणीने एका मुलाखतीत सांगितले होते. Also Read : हिचकी या चित्रपटातील भूमिकेसाठी राणी मुखर्जी नव्हती निर्मात्यांची पहिली पसंती...