Join us
Daily Top 2Weekly Top 5

​भारताची पहिली ‘स्पेस मुव्ही’ पाहण्यासाठी असा सज्ज! पाहा, हॉलिवूडच्या तोडीचा अद्भूत ट्रेलर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 13:45 IST

अद्यापही ‘स्पेस मुव्हिज’कडे बॉलिवूडचे लक्षचं गेलेले नाही. पण भारतातील दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीने मात्र ‘स्पेस मुव्ही’ बनवण्याचे आव्हान पेलले आहे.

आत्तापर्यंत हॉलिवूडच्या अनेक ‘स्पेस मुव्हिज’ तुम्ही पाहिल्या असतील. ‘अपोलो12’,‘मून’, ‘ग्रॅव्हिटी’,‘एलियन’ असे अनेक अंतराळातील वेगवेगळ्या अनुभवांवर, कल्पनांवर आधारित हॉलिवूड सिनेमे आपल्याला माहित आहे.  दुर्दैवाने बॉलिवूडमध्ये अद्याप अशी एकही ‘स्पेस मुव्ही’ आलेली नाही. कारण अद्यापही अशा ‘स्पेस मुव्हिज’कडे बॉलिवूडचे लक्षचं गेलेले नाही. पण भारतातील दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीने मात्र ‘स्पेस  मुव्ही’ बनवण्याचे आव्हान पेलले आहे. होय, भारताची पहिली ‘स्पेस  मुव्ही’ ‘टिक टिक टिक’चा ट्रेलर रिलीज झालायं. हा ट्रेलर पाहून तुम्ही अवाक् व्हाल. जिथे बॉलिवूड अशा सिनेमाबद्दल विचारही करू शकत नाही, तिथे साऊथमध्ये हा सिनेमा तयार झालायं.‘टिक टिक टिक’ या चित्रपटात अंतराळातील कथा दाखवली गेली आहे. यात जयम रवि लीडरोलमध्ये आहे. यात तो जादूगाराची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा जादूगार भारताला उल्कापातापासून वाचवतो, अशी याची कथा आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सुरु होतो आणि मनाचा ठाव घेतो, जणू आपण एखादा हॉलिवूडपट पाहतोय, असे हा ट्रेलर पाहताना वाटते. म्हणजेच, हॉलिवूड ‘स्पेस मुव्हीज’पेक्षा हा ट्रेलर कुठेही कमी नाही.ALSO READ : स्टार वॉर्स फिव्हर : या ‘स्पेस मुव्हीज’ तुम्ही पाहाच!शक्ती सुंदर राजन यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची दाक्षिणात्य प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. हा चित्रपट तुम्हाला अंतराळाची एक अद्भूत सैर घडवेल, असा दावा शक्ती सुंदर राजन यांनी केला आहे.  जयम रवि आणि सुंदर राजन यांच्या जोडीचा एकत्र असा हा दुसरा सिनेमा आहे. यापूर्वी कॉलिवूडच्या जॉम्बी या चित्रपटात ही जोडी एकत्र दिसली होती. ‘मिरूतन’ नावाचा हा सिनेमा २०१६ मध्ये रिलीज झाला होता. आता ‘टिक टिक टिक’ किती हिट ठरतो आणि हॉलिवूडच्या ‘स्पेस मुव्हीज’वर किती भारी पडतो, ते दिसेलच. शिवाय बॉलिवूड या चित्रपटाकडून किती प्रेरणा घेतो, तेही आपण पाहूच. तोपर्यंत तुम्ही या चित्रपटाचा ट्रेलर बघा आणि तो कसा वाटला, ते आम्हाला जरूर कळवा.