Join us
Daily Top 2Weekly Top 5

​२५ वर्षांच्या आलिया भट्टची प्रॉपर्टी किती आहे हे वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2018 09:54 IST

आलिया भटचा 'राजी' हा चित्रपटा कालच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला समीक्षकांची पसंती मिळाली आहे. आलियाच्या भूमिकेचे तर समीक्षकांनी ...

आलिया भटचा 'राजी' हा चित्रपटा कालच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला समीक्षकांची पसंती मिळाली आहे. आलियाच्या भूमिकेचे तर समीक्षकांनी चांगलेच कौतुक केले आहे. आलियाने स्टुंडट ऑफ द इयर या चित्रपटापासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. आलिया ही दिग्दर्शक-निर्माते महेश भट्ट यांची मुलगी असल्याने बॉलिवूडमध्ये प्रवेश करणे तिच्यासाठी सोपे होते. पण बॉलिवूडमध्ये आल्यानंतर तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले एक स्थान निर्माण केले आहे. टू स्टेट, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, उडता पंजाब यांसारखे अनेक हिट चित्रपट तिने बॉलिवूडला दिले आहेत.बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये आज आलियाची गणना केली जाते. त्यामुळे आलिया ही चित्रपटात काम करण्यासाठी तगडे मानधन घेते. राजी या चित्रपटासाठी तर तिने ४ कोटी रुपये घेतले असल्याची चर्चा आहे. फिनॅप डॉट को डॉट इन या वेबसाईटने आलियाकडे किती प्रॉपर्टी आहे याविषयी नुकतीच एक बातमी दिली आहे. त्यांच्यानुसार केवळ २५ वर्षांची आलिया ही २५ कोटीहून अधिक पैशांची मालकीण आहे. त्यांनी दिलेल्या बातमीनुसार, आलिया केवळ जाहिरातींमधून एका वर्षाचे ३.६ कोटी रुपये कमवते. कोका कोला, स्टँडर्ड फॅन, फिलिप्स, कार्नेटो, गार्नियर, मेक माय ट्रिप आणि फ्रूटी यांसारख्या कंपन्यांच्या जाहिराती आलिया करते. त्यानुसार आलियाला केवळ जाहिरातीचे दिवसाला एक लाख रुपये मिळतात. आलियाने अनेक ठिकाणी इन्व्हेस्टमेंट देखील करून ठेवल्या आहेत. आलिया भट्ट एका चित्रपटाचे कित्येक कोटींमध्ये मानधन घेते. तसेच अनेक चित्रपटांमध्ये तिने गाणी देखील गायली आहेत. गाणे गाण्यासाठी देखील ती तगडे मानधन घेते. आलियाने इतक्या लहान वयात स्वतःचे घर देखील घेतले आहे. आलिया अनेक वर्षांपासून वडील महेश भट्ट आणि आई सोनी राजदानच्या जुहू येथील घरात राहात होती. आता आलियाकडे स्वतःचे अपार्टमेंट फ्लॅट आहे. हे तिला महेश भट्ट यांनी गिफ्ट केले आहे. हे घर महेश भट्ट यांच्या जुहूच्या घरापासून थोड्याच अंतरावर आहे. सध्या या घराची किंमत साडे तीन कोटी रुपयाहून अधिक आहे. Also Read : रिसेप्शन सोनम कपूरचे पण चर्चेचा विषय ठरले रणबीर कपूर आणि आलिया भट्ट !