वाचा, ऐश्वर्याच्या पर्पल लिपस्टिकवर काय म्हणाली सोनम!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2016 16:52 IST
कान फिल्म फेस्टिवलमध्ये पर्पल लिपस्टिक लावून रेड कार्पेटवर उतरलेल्या ऐश्वर्याची खूप चर्चा झाली. ऐश्वर्याचे पर्पल लिपस्टिक सोशल मीडियावर बºयावाईट ...
वाचा, ऐश्वर्याच्या पर्पल लिपस्टिकवर काय म्हणाली सोनम!!
कान फिल्म फेस्टिवलमध्ये पर्पल लिपस्टिक लावून रेड कार्पेटवर उतरलेल्या ऐश्वर्याची खूप चर्चा झाली. ऐश्वर्याचे पर्पल लिपस्टिक सोशल मीडियावर बºयावाईट प्रतिक्रिया उमटल्या. ऐश्वर्याच्या या पर्पल लिपिस्टिकवर आता कान्सला हजेरी लावणारी अभिनेत्री सोनम कपूर हिनेही प्रतिक्रिया दिली आहे. सोनम कपूर म्हणजे परखडचं बोलणार...ऐश्वर्याच्या पर्पल लिपस्टिकवरही सोनमने तिला साजेशी अशी परखड प्रतिक्रियाचं दिली आहे. सोनमच्या मते, ऐश्वर्याला स्वत:ची चर्चा घडवून आणायची होती. म्हणून जाणीवपूर्वक तिने पर्पल शेडची लिपस्टिक निवडली.ऐश्वर्याच्या पर्पल लिपस्टिकवर बरीच टीका झाली, याबद्दल तुला काय वाटते, असा प्रश्न सोनमला विचारण्यात आला. यावर सोनमचे उत्तर होते, तिने हे जाणीवपूर्वक केले. पर्पल लिपस्टिकमुळे ऐश्वर्याची चर्चा झाली. याबद्दल तिने आनंदी असायला हवे. माझ्या मते, चर्चा घडवून आणण्यासाठीच ऐश्वर्याने पर्पल लिपस्टिक निवडली. तिला जे हवे, ते तिला मिळाला आणि हे चांगले आहे, असे सोनम म्हणाली. ऐश्वर्याने हे लॉरियलच्या सांगण्यावरून केले होते का, असे विचारले असता सोनमने नकारार्थी उत्तर दिले. ऐश्वर्या त्यादिवशी लॉरियलसाठी वॉक करीत होती, असे मला आठवत नाही, असे ती म्हणाली. आता सोनमने प्रतिक्रिया दिली ऐश्वर्या यावर काय म्हणते, ते आता बघू...!!