Join us
Daily Top 2Weekly Top 5

वाचा: कंगनासोबतच्या वादावर काय म्हणाला हृतिक !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2016 20:14 IST

कंगना रानोट व हृतिक रोशन यांच्यातील कायदेशीर वाद आता संपला, असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकताय. हा वाद ...

कंगना रानोट व हृतिक रोशन यांच्यातील कायदेशीर वाद आता संपला, असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकताय. हा वाद आपल्यालेखी संपलेला असला तरी हृतिकच्या नक्कीच नाही. आयफा अवार्डमध्ये कंगनासोबतच्या वादावर हृतिकला प्रश्न विचारण्यात आला. कंगनासोबतचा वाद मागे सोडलास काय, असा प्रश्न हृतिकला केला गेला. यावर हृतिकचे उत्तर होते, ‘काहीही मागे सोडलेले नाही. सगळे काही लवकर ‘सर्वांसमोर’ असेल. सगळे काही माझ्या समोर आहे आणि लवकरच ते तुमच्या समोरही येईल, असेही हृतिक म्हणाला. यावर्षाच्या प्रारंभी कंगनाने एका मुलाखतीत हृतिकचा उल्लेख ‘सिली एक्स’ असा केला होता. येथूनच हृतिक व कंगनातील वाद चव्हाट्यावर आला होता. यानंतर दोघांनी परस्परांना कायदेशीर नोटीस पाठवली होती.