इथे वाचा..लंगोटबद्दल काय बोलला सलमान..
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2016 17:22 IST
सलमान खान आणि अनुष्का शर्मा यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘सुल्तान’चा ट्रेलर आज मंगळवारी रिलीज झाला. या चित्रपटात सलमान खान ...
इथे वाचा..लंगोटबद्दल काय बोलला सलमान..
सलमान खान आणि अनुष्का शर्मा यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘सुल्तान’चा ट्रेलर आज मंगळवारी रिलीज झाला. या चित्रपटात सलमान खान पहेलवानाच्या भूमिकेत दिसणार आहे. साहजिकच पहेलवान म्हटले की, लंगोट नेसलेला पहेलवान आलाच. ट्रेलर लॉन्चवेळी सलमान आणि अनुष्का शर्मा भरभरून बोलले. यावेळी सलमानने लंगोटबद्दलचे किस्से रंगवून सांगितले. सीन्ससाठी पहिल्यांदा लंगोट नेसून बाहेर आलो तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू होते. लंगोट नेसल्यावर हिरोईन्स शॉट्स आणि स्वीमसूटमध्ये काय फिल करीत असतील, ते मला कळले, असे हसत हसत सलमान म्हणाला..लंगोटमधील शूटींग मी खरोखरच एन्जॉय केली, हेही सांगायला तो विसरला नाही. येत्या ६ जुलैला ‘सुल्तान’ रिलीज होतोय, तोपर्यंत तरी लंगोटमधील सलमानला बघण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल...