वाचा : असे करते आलिया दरवर्षी ‘ख्रिसमस सेलिब्रेशन’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2016 13:31 IST
लहानपणापासूनच आलिया भट्ट तिच्या कुटुंबियांसमवेत ख्रिसमसचा सण साजरा करत असते. आई सोनी राझदान, वडील महेश भट्ट, बहीण शाहीन, एन.राझदान ...
वाचा : असे करते आलिया दरवर्षी ‘ख्रिसमस सेलिब्रेशन’!
लहानपणापासूनच आलिया भट्ट तिच्या कुटुंबियांसमवेत ख्रिसमसचा सण साजरा करत असते. आई सोनी राझदान, वडील महेश भट्ट, बहीण शाहीन, एन.राझदान आणि गुर्टूड होएल्झर हे सर्व एकत्र नाताळच्या सणाचा आनंद लुटतात. करण जोहर हा तिच्या आयुष्यातील खरा सँताक्लॉज असल्याचे तिने शेअर केले आहे. तसेच नुकतेच सण साजरे करण्याचे सिक्रेट्स, तयारी, उत्साह तिच्या चाहत्यांसोबतही शेअर केलाय. पाहूयात, सण म्हणजे आलियाच्या मते नेमकं काय काय आहे? सेलिब्रेशन मोड... ती सांगते,‘ख्रिसमस हा सण माझ्यासाठी खुप खास असतो. लहानपणीपासून ते आत्तापर्यंत मी सर्व सणांपेक्षा ख्रिसमसला जास्त धम्माल, मजा करायचे. दरवर्षी ख्रिसमसला आई घरी स्वत: पारंपारिक जेवण बनवते. स्टफ्ड रोस्ट टर्की, ब्रेड सॉस, मॅश पोटॅटो, ब्राऊन ग्रेव्ही आणि ख्रिसमस स्पेशल पुडिंग हे आम्ही सेलिब्रेशन म्हणून मजेने खातो.’ बिर्इंग मेरी.. ‘सण म्हणजे घरात सर्वांनी एकत्र जमणं. एकत्र बसून सर्वांनी गाणे गायचे, डान्स करायचा, धम्माल, मस्ती करायची. माझे आजी-आजोबांचं वय जवळपास ८० च्या आसपास आहे. ते जरी वयस्कर असले तरीही ते इतरांच्या बाबतीत खुपच तरूण वाटतात. माझ्या आजोबांना शॉपिंग करायला प्रचंड आवडतं. तर माझी आजी आमच्यासाठी अनेक गिफ्टस, वस्तू घेऊन द्यायची. मी गिफ्ट पॅकिंग करायला शिकले केवळ तिच्यामुळे. ती गिफ्ट तिच्या बटव्यात आणायची आणि आम्हाला द्यायची. मी तेच माझ्या बहिणीसाठी केलं. मी जेव्हा तिला एक बॅग गिफ्ट दिली तेव्हा तिने त्यात वस्तू ठेवायला सुरूवात केली.’ ख्रिसमस शॉपिंग...मला आठवतं, ‘मी आणि माझी बहीण शाहीन आम्ही २५ डिसेंबरला सकाळी बाहेर पडतो, आणि प्रचंड शॉपिंग करत असतो. सँता येईल म्हणून रात्रीपासून जागेच राहायचो. तो आम्हाला कधीही भेटला नाही, की आम्हाला गिफ्ट दिले नाही. आमच्यासाठी घरातच गिफ्ट आणून ठेवलेले असायचे आणि मग सगळे म्हणायचे की हे सँताने तुमच्यासाठी ठेवले आहे. मला ख्रिसमसचं शॉपिंग आजही खुप आवडतं. ’ ख्रिसमसला माझा फेव्हरेट - पास्ता‘मी सँण्डविच बनवू शकते. पण, मी फार काही चांगली कूक नाही. मी आणि माझी बहीण शाहीन आमच्या आईला किचनमध्ये मदत करतो. मागील वर्षीपर्यंत मी शाकाहारी होते आणि माझी फेव्हरेट डिश मी ख्रिसमसला खायचे. पास्ता ही माझी फार आवडीची डिश आहे. ख्रिसमसलाही मी ती खायचे. ‘करण जोहर माझा सँता’ माझ्या आयुष्यात सँताक्लॉज कोण आहे असे जर मला कुणी विचारले तर मी सांगेन की, करण जोहर हा माझा खरा सँताक्लॉज. मला जे हवं ते तो मला देत असतो. काही ना काही गिफ्टस तो मला देतो. जेव्हाही मी त्याच्या आॅफिसला भेट देतो तेव्हा तो काही ना काही मला देतो. कधीकधी तो स्वत:साठी खरेदी केलेल्या वस्तूही मला देऊन टाकतो.