Join us
Daily Top 2Weekly Top 5

​ Read details : असा साजरा होणार अमिताभ बच्चन यांचा ७५ वा वाढदिवस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 15:48 IST

येत्या आॅक्टोबरमध्ये बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन ७५ वर्षांचे होत आहेत. मग,सेलिब्रेशन तो बनता है ना? या सेलिब्रेशनची तयारी सुरु ...

येत्या आॅक्टोबरमध्ये बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन ७५ वर्षांचे होत आहेत. मग,सेलिब्रेशन तो बनता है ना? या सेलिब्रेशनची तयारी सुरु झाली आहे. होय, यंदा अभिषेक बच्चन, ऐश्वर्या बच्चन आणि श्वेता नंदा अशा तिघांनी या सेलिबे्रशनची जय्यत तयारी चालवली आहे. बिग बी यांच्या वाढदिवशी ग्रँण्ड पार्टी देण्याचे त्यांचे प्लानिंग आहे. हे तिघेही बिग बी यांना मोठे सरप्राईज देण्याच्या तयारीत असल्याचेही कळतेय.सूत्रांनी दिलेली माहिती खरी मानाल तर, अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसासाठी फिल्म सिटीची तीन मजली इमारत बुक करण्यात आली आहे. अभिषेक , ऐश्वर्या व श्वेता हे तिघेही जातीने सगळीकडे लक्ष देत आहेत. या पार्टीसाठी एका मॅनेजमेंट कंपनीशी त्यांची चर्चा झाल्याचेही कळतेय. तूर्तास गेस्ट लिस्ट अर्थात पाहुण्यांची यादी फायनल झालेली नाही. बिग बींच्या ७० व्या वाढदिवसाला इंडस्ट्रीतला प्रत्येक मोठा स्टार पोहोचला होता. यंदाच्या या सेलिब्रेशनमध्येही बॉलिवूडचा प्रत्येक मोठा चेहरा दिसणे अपेक्षित आहे. एकंदर काय तर बिग बींच्या वाढदिवसाची पार्टी खास होणार, हे तर नक्की आहे. अर्थात या पार्टीत खास काय काय असणार, हे मात्र पार्टीच्याच दिवशी आपल्याला कळणार आहे.गतवर्षीचा वाढदिवस अमिताभ यांनी ‘जलसा’वर साजरा केला होता. येणारा ७५ वा वाढदिवस मात्र अमिताभ यांच्यासाठी खरोखरीच खास असणार आहे. तूर्तास अमिताभ बच्चन ‘१०२ नॉट आऊट’मध्ये बिझी आहेत. याशिवाय ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मध्येही ते दिसणार आहेत. या चित्रपटात प्रथमच आमिर खान आणि अमिताभ ही जोडी एकत्र येणार आहेत.