Join us

हास्यअभिनेते रजाक खान यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2016 14:13 IST

हास्यअभिनेते रजाक खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईतील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा झटका अाल्याने मंगळवारी हॉस्पिटलमध्ये दाखल ...

हास्यअभिनेते रजाक खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईतील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा झटका अाल्याने मंगळवारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. नव्वदपेक्षाही अधिक चित्रपटात त्यांनी काम केले आहे. हॅलो ब्रदर, हेरा फेरी, बादशाह, क्या कुल है हम, अखियोंसे गोली मारे यांसारख्या चित्रपटातील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या होत्या. त्यांनी अभिनेते फारूक शेख यांच्यासोबत चमत्कार या मालिकेतही काम केले होते. त्यांनी या मालिकेत साकारलेली मकोडी पेहेलवानची भूमिका खूप गाजली होती. कॉमेडी नाईटस विथ कपिल या कार्यक्रमाच्या काही भागातही त्यांनी काम केले होते.