Join us
Daily Top 2Weekly Top 5

रवीना टंडनने 'कुछ कुछ होता है' सिनेमाला दिलेला नकार, ऑफर झालेली 'ही' भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 18:19 IST

"मी काही सिनेमांना नकार दिला यामागे काही कारण होती...", रवीना टंडन काय म्हणाली?

तरुणाईचा आवडता सिनेमा 'कुछ कुछ होता है' आजही तितकाच ताजा आहे. करण जोहरने याच सिनेमातून दिग्दर्शनात पदार्पण केलं होतं. सिनेमात शाहरुख खान, सलमान खान, राणी मुखर्जी, काजोल, फरिदा जलाल, जॉनी लिव्हर, रीमा लागू अशी तगडी स्टारकास्ट होती. सलमान खानचा सिनेमात छोटा रोल होता. या भूमिकेसाठी अनेक अभिनेत्यांनी करणला थेट नकार दिला होता. सलमानने एकाच मीटिंगमध्ये त्याला होकार दिला होता. शिवाय राणी मुखर्जीच्याही भूमिकेसाठी आधी काही अभिनेत्रींना विचारणा झाली होती. त्यातच एक रवीना टंडन होती. रवीनाने भूमिकेला का नकार दिला याचं कारण सांगितलं.

झूमला दिलेल्या मुलाखतीत रवीना टंडन म्हणाली, "मी काही सिनेमांना नकार दिला यामागे काही कारण होती. जसं की 'कुछ कुछ होता है'.  करण मला आजही त्यावरुन सुनावतो की तू माझ्या पहिल्याच सिनेमाला नकार दिलेला. पण मीही त्याला हेच सांगते की मला काम करायला नक्कीच आवडलं असतं. तू माझा चांगला मित्र आहेस. पण तेव्हा मी मुख्य अभिनेत्री म्हणून करिअरमध्ये चांगल्या टप्प्यावर होते. अशा वेळी मी सहायक अभिनेत्रीची भूमिका कशी स्वीकारु?"

ती पुढे म्हणाली, "मी विचारपूर्वकच नकार दिला होता. माझ्या वाट्याला पाच सीन, पाच गाणी असती तरी चाललं असतं पण भूमिका मात्र मुख्य अभिनेत्रीचीच हवी होती. माझी करिअरची सुरुवातही अशाच पद्धतीने झाली होती. त्यामुळे माझ्यासाठी तो निर्णय अवघड होता."

English
हिंदी सारांश
Web Title : Raveena Tandon rejected 'Kuch Kuch Hota Hai', role revealed.

Web Summary : Raveena Tandon declined a supporting role in 'Kuch Kuch Hota Hai', citing her established lead actress status. She preferred substantial lead roles.
टॅग्स :रवीना टंडनबॉलिवूड