आलिया भट ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. आजवर आलियाने जास्तीत जास्त हिट सिनेमे दिले आहेत. तिचे मोजकेच सिनेमे फ्लॉप झाले आहेत. २०१६ साली आलेल्या 'कपू्र अँड सन्स' सिनेमातही ती दिसली होती. या सिनेमाला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला होता. ज्येष्ठ अभिनेत्री रत्ना पाठक यांनी आलिया भटच्या सेटवरील वर्तवणुकीवर भाष्य केलं आहे.
'साराभाई व्हर्सेस साराभाई' फेम अभिनेत्री रत्ना पाठक यांनी नुकतीच 'पिंकव्हिला'ला मुलाखत दिली. यावेळी त्या म्हणाल्या, "आलिया सेटवर खूप अलर्ट असते. शूटिंगच्या सेटवरही ती पूर्ण वेळ स्क्रीनसमोर बसायची. हे ती फक्त तिच्या शॉटवेळी करत नव्हती, तर दुसऱ्यांच्या शॉटवेळीही ती हेच करायची. आलिया कामाबद्दल अतिशय सतर्क असायची. आलिया तिच्या पिढीच्या इतर कलाकारांसारखी ओव्हर क्युट बनायचा प्रयत्न करत नाही. आजकालचे तरुण कलाकार सेटवर उगाचच एंटरटेन करायचा प्रयत्न करतात. पण हेच नंतर अभिनयात मार खायचे. पण आलियाचं असं नव्हतं. ती कमी बोलायची. कपूर अँड सन्समध्ये आमचे एकत्र सीन्स नव्हते त्यामुळे माझं एकदाच तिच्याशी बोलणं झालं. पण त्यातही मला तिचा स्वभाव चांगला वाटला."
'कपूर अँड सन्स' हा एक फॅमिली ड्रामा सिनेमा होता. यामध्ये ऋषी कपूर यांचीही भूमिका होती. तर आलिया भट, फवाद खान आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे कलाकार होते. रत्ना पाठक यांचीही सिनेमात भूमिका होती. धर्मा प्रोडक्शन अंतर्गत हा सिनेमा होता.
रत्ना पाठक शाह कायम आपली मतं परखडपणे मांडत असतात. नवोदित कलाकारांवर त्यांनी वेळोवेळी टिप्पणी केली आहे. तसंच सामाजिक विषय, महिलांच्या विषयांवरही त्यांनी नेहमीच भाष्य केलं आहे.
Web Summary : Ratna Pathak Shah praises Alia Bhatt's dedication on the 'Kapoor & Sons' set. Unlike some contemporaries, Alia remained focused and observant, impressing Shah with her serious approach to acting and avoiding unnecessary on-set theatrics.
Web Summary : रत्ना पाठक शाह ने 'कपूर एंड संस' के सेट पर आलिया भट्ट के समर्पण की सराहना की। कुछ समकालीन लोगों के विपरीत, आलिया केंद्रित और चौकस रहीं, जिससे शाह अभिनय के प्रति उनके गंभीर दृष्टिकोण से प्रभावित हुईं और उन्होंने सेट पर अनावश्यक दिखावे से परहेज किया।