'मंटो'या बोयोपिकमध्ये अशी दिसणार रसिका दुग्गल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2017 12:23 IST
पाकिस्तानी लेखक सादत हसन मंटो यांच्या जीवनावर आधारित 'मंटो' हा बायोपिक यावर्षी रसिकांच्या भेटीला येणार आहे.या सिनेमात अभिनेता नवाजुद्दीन ...
'मंटो'या बोयोपिकमध्ये अशी दिसणार रसिका दुग्गल
पाकिस्तानी लेखक सादत हसन मंटो यांच्या जीवनावर आधारित 'मंटो' हा बायोपिक यावर्षी रसिकांच्या भेटीला येणार आहे.या सिनेमात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी मंटो यांची भूमिका साकारत असून त्यांच्या पत्नीची म्हणजेच सत्या मंटोची भूमिका अभिनेत्री रसिका दुग्गल साकारणार आहे.नुकताच सिनेमातील रसिकांचा भूमिकेची पहिली झलक समोर आली आहे.या सिनेमातील साफिया मंटोची भूमिकेसाठी रसिका खूप मेहनत घेत असून ऑनस्क्रीन रसिकांना साफिया मंटोच भासावी यासाठी ती पुरेपुर तयारी करत आहे.समोर आलेल्या लुकमध्ये रसिका हुबेहुबे सत्या मंटोप्रमाणेच भासत असून ऑनस्क्रीनही ती या भूमिकेला न्याय मिळून देणार असा विश्वास सिनेमाची दिग्दर्शिका नंदिता दासने व्यक्त केला आहे.याविषयी रसिकाने सांगितले की,मंटो यांच्या जीवनाविषयी फारशी संग्रहित अशी माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे लाहोरमध्ये काही तरुणींना भेटले. त्यांच्याकडून मंटो आणि साफिया यांच्याविषयी जाणून घेतलं. त्यावरुनच साफिया ही भूमिका माझ्या अंदाजात साकारण्याचा प्रयत्न करणार आहे. मला विविध साहित्यिकांचं साहित्य, जुन्या कथा वाचायला फार आवडतात. त्यामुळे ही भूमिका साकारण्यासाठी लागणारी सर्व मेहनत मी केली आहे. जवळपास दोन ते तीन महिने 'मंटो' या सिनेमासाठी तयारी मी केली आहे. 'मंटो' यांची विविध पुस्तके मी वाचली आहेत.'मंटो' सिनेमाची कथा आजच्या काळाला अनुरुप अशीच आहे. त्यामुळे त्यात भूमिका साकारण्याची संधी मिळणं माझ्यासाठी एक मोठा अनुभव आहे.'मंटो' या सिनेमाचं शुटिंग जुलै महिन्यांपर्यंत संपणार असून जुलैनंतर गौरव बक्षी यांच्या राजकारणाची पार्श्वभूमी तसेच रोमँटिक टच असलेल्या सिनेमात रसिका काम करणार आहे.