Join us

'शेरलॉक होम्स'मध्ये आयरीनच्या जागी रसिका दुग्गलची वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 19:59 IST

Rasika Duggal : 'मिर्जापुर', 'मेड इन हेव्हन', 'दिल्ली क्राइम'सारख्या जवळपास ११ वेब सिरीजद्वारे लक्ष वेधणारी रसिका दुगल 'शेरलॉक होम्स'च्या भारतीय आवृत्तीसाठी सज्ज झाली आहे.

'मिर्जापुर', 'मेड इन हेव्हन', 'दिल्ली क्राइम'सारख्या जवळपास ११ वेब सिरीजद्वारे लक्ष वेधणारी रसिका दुगल 'शेरलॉक होम्स'(Sherlock Homes)च्या भारतीय आवृत्तीसाठी सज्ज झाली आहे. ही सिरीज भारतीय शैली बनवण्यात येणार असून, निर्मितीसह दिग्दर्शनाची जबाबदारीही श्रीजीत मुखर्जी यांनी सांभाळली आहे. शेरलॉक होम्समध्ये आयरीन एडलरने साकारलेली भूमिका अभिनेत्री रसिका दुग्गल (Rasika Duggal) साकारणार आहे.

शेरलॉक होम्सच्या भारतीय आवृत्तीमध्ये के. के. मेननला शर्लक होम्स आणि रणवीर शौरीला डॉ. जॉन वाटसनच्या रूपात दाखवण्यात येईल, तर मूळ सिरीजमध्ये आयरीन एडलरने रंगवलेली व्यक्तिरेखा रसिका साकारणार आहे. यामध्ये मिसेस हडसनच्या रूपात उषा उथुप आणि मायक्रॉफ्ट होम्सच्या रूपात कौशिक सेन आहेत. रसिकाने साकारलेली आयरीन शेरलॉक होम्सला मागे टाकणारी एकमेव महिला आहे. रसिकानं आजवर साकारलेल्या भूमिका पाहता या व्यक्तिरेखेला न्याय देण्यात ती नक्कीच यशस्वी होईल. याचं चित्रीकरण लवकरच कोलकात्यामध्ये सुरू होणार आहे.

भारतीय पार्श्वभूमीवर बेतलेल्या या मालिकेचे दिग्दर्शन चित्रपट निर्माते सृजित मुखर्जी करणार आहेत. के के मेननने भारतीय रूपांतरात शेरलॉक होम्सची भूमिका केली आहे आणि रणवीर शौरी डॉ. जॉन वॉटसनची भूमिका साकारत आहे. उषा उथुप या शोमध्ये मिसेस हडसनच्या भूमिकेत आणि कौशिक सेन मायक्रॉफ्ट होम्सच्या भूमिकेत दिसणार आहेत.