Join us

"अय्यो... जास्त विचार नको करू बाबू..."; रश्मिकाच्या उत्तराची जोरदार चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2023 06:30 IST

रश्मिकाचा क्रश कोण, हा प्रश्न नेहमीच सर्वांना सतावत असतो.

Rashmika Mandanna Crush: 'पुष्पा’मध्ये श्रीवल्ली बनून जगभरातील असंख्य सिनेरसिकांना अक्षरश: वेड लावणारी रश्मिका मंदाना नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. पण, रश्मिकाचा क्रश कोण, हा प्रश्न नेहमीच सर्वांना सतावत असतो. दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडासोबत रश्मिकाचे नाव जोडले जात आहे. दोघांच्या नात्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असते.

रश्मिकाने तिच्या वाढदिवसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. एका युझरने रश्मिकाच्या व्हिडीओतील स्क्रीनशॅाटसह विजयचा फोटो शेअर केला. यासोबत त्याने रश्मिका व विजय एकमेकांना डेट करत असून, एकाच घरात राहात असल्याचेही लिहिले. या पोस्टला रश्मिकाने "अय्यो... जास्त विचार नको करू बाबू..." असे लिहून दिलेले उत्तर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

टॅग्स :रश्मिका मंदानाविजय देवरकोंडाबॉलिवूडपुष्पा