Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘या’ अभिनेत्रीने दिला हॉट किसींग सीन, तुटला साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 12:25 IST

‘डियर कॉम्रेड’चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर तर विजय देवरकोंडा जणू प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला. पण याच विजय देवरकोंडमुळे अभिनेत्रीचा साखरपुडा तुटला.

ठळक मुद्दे विजय देवरकोंडा आणि रश्मिका यांनी बेधडक किसींग सीन दिलेत. सध्या या सीनची प्रचंड चर्चा आहे.

‘बाहुबली’ रिलीज झाला आणि साऊथस्टार प्रभास अचानक चर्चेत आला. लोकांनी त्याला कधी नव्हे इतके डोक्यावर घेतले. आता साऊथ स्टार विजय देवरकोंडा याचीही अशीच चर्चा आहे. ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटानंतर विजय देवरकोंडालाही प्रेक्षकांनी  डोक्यावर घेतले. ‘डियर कॉम्रेड’चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर तर विजय जणू प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला. पण याच विजय देवरकोंडमुळे अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचा साखरपुडा तुटल्याचे कळतेय.

होय,विजय देवरकोंडाचा ‘डियर कॉम्रेड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यात साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदाना त्याच्यासोबत लीड रोलमध्ये आहे. ‘डियर कॉम्रेड’चा ट्रेलर रिलीज झाला आणि तो पाहून रश्मिकाचा भावी नवरा इतका संतापला की त्याने साखरपुडा तोडला. अलीकडे रश्मिकाने कन्नड अभिनेता रक्षित शेट्टीसोबत साखरपुडा केला होता. पण आता हा साखरपुडा तुटला आहे. अर्थात अद्याप याबद्दल कुठलाही अधिकृत खुलासा झालेला नाही.

‘डियर कॉम्रेड’च्या ट्रेलरमध्ये रश्मिका आणि विजय यांच्या एक हॉट किसींग सीन दाखवला गेला आहे. याच किसींग सीनमुळे रक्षित भडकला आणि त्याने रश्मिकासोबतचा साखरपुडा तोडला.

‘डियर कॉम्रेड’मधील हा किसींग सीन गेल्या काही दिवसांपासून कमालीचा चर्चेत आहे. आधी हा किसींग सीन अभिनेत्री साई पल्लवीच्या वाट्याला आला होता. पण तिने हा सीन करण्यास नकार दिला आणि मेकर्सनी ‘डियर कॉम्रेड’मधून साई पल्लवीला बाहेरचा रस्ता दाखवला. यानंतर तिच्या जागी या चित्रपटात रश्मिका मंदाना हिची वर्णी लागली.

तिने आणि विजय देवरकोंडाने हा हॉट लिपलॉक सीन शूट केला. दाक्षिणात्य सिनेमात किसींग सीन फार क्वचित दिसतात. पण विजय देवरकोंडा आणि रश्मिका यांनी बेधडक किसींग सीन दिलेत. सध्या या सीनची प्रचंड चर्चा आहे.

टॅग्स :विजय देवरकोंडा