Join us
Daily Top 2Weekly Top 5

RIP Shashi Kapoor : ​शशी कपूर नेहमी आमच्या अंतकरणात राहतील- राज बब्बर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2017 20:19 IST

जेष्ठ अभिनेता शशी कपूरच्या निधनाने अख्ख्या बॉलिवूडला दु:ख झाले आहे. त्यांच्या निधनाने राज बब्बरनेही दु:ख व्यक्त केले असून शशी ...

जेष्ठ अभिनेता शशी कपूरच्या निधनाने अख्ख्या बॉलिवूडला दु:ख झाले आहे. त्यांच्या निधनाने राज बब्बरनेही दु:ख व्यक्त केले असून शशी कपूर आमच्या अंतकरणात नेहमी राहतील असे म्हणाले. हिंदी चित्रपटसृष्टीचा चॉकलेट हिरो अशी शशी कपूर यांची ओळख होती. त्यांच्या दिसण्यावर त्या काळात मुली फिदा होत्या. ते तरुणींच्या गळ्यातला ताईत बनले होते असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. हॅडसम हिरो अशी त्यांची बॉलिवूडमध्ये ओळख होती.मुंबईतल्या मांटुग्याच्या डॉन बॉस्को शाळेत शशी कपूर यांचे शिक्षण झाले. त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर हे एक प्रसिद्ध अभिनेते होते. पृथ्वी थिएटर या वडिलांच्या थिएटर कंपनीमधूनच त्यांनी त्यांच्या कारकिदीर्ला सुरुवात केली. पृथ्वी थिएटरच्या शकुंतला या नाटकाने त्यांच्या अभिनय कारकिदीर्ला सुरुवात झाली. त्यानंतर 1945 मध्ये के.एल.सहगल आणि सुरैय्या यांच्या तदबीर सिनेमात त्यांनी शशीराज नावाची भूमिका साकारली. त्यानंतर राज कपूर यांच्या आग आणि आवारा या सिनेमात शशी कपूर यांनी राज कपूर यांच्या बालपणाची भूमिका साकारली. राज बब्बर यांनी ट्वीट केले की, शशी क पूरच्या निधनाने खूपच दु:ख झाले. त्यांचा अभिनयाची आम्हाला सदैव आठवण राहिल आणि ते नेहमी आमच्या अंतकरणात राहतील.  }}}}