Join us
Daily Top 2Weekly Top 5

चौकना!! आर्चीसाठी रॅपर रफ्तारनं तयार केलं ‘रॅप सॉन्ग’, क्लिक करताच व्हाल ‘सैराट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2020 14:40 IST

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध रॅपर रफ्तारने रिंकूला दिले वाढदिवसाचे गिफ्ट

ठळक मुद्देहे गाणे ‘हंड्रेड’ या वेबसीरिजमधील सौम्या व नेत्रा या पात्राला समर्पित आहे.

तुमची आमची आर्ची अर्थात रिंकू राजगुरू सध्या बॉलिवूडमध्ये जाम धम्माल करतेय. गेल्या महिन्यात रिंकूची ‘हंड्रेड’ ही वेबसीरिज रिलीज झाली आणि रिंकूने बॉलिवूड कलाकारांनाही वेड लावले. येत्या 3 जूनला रिंकूचा वाढदिवस आहे. पण तत्पूर्वी बॉलिवूडचा सुप्रसिद्ध रॅपर रफ्तारने रिंकूला वाढदिवसाचे गिफ्ट दिले आहे. होय, रफ्तार व कृष्णाने करण वाहीसोबत मिळून रिंकूसाठी एक खास गाणे तयार केले आहे.  ‘चौकना... बच के रहेना...’ असे या रॅप सॉन्गचे बोल आहेत.हे गाणे ‘हंड्रेड’ या वेबसीरिजमधील सौम्या व नेत्रा या पात्राला समर्पित आहे. ‘हंड्रेड’ सीरिजमध्ये बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ताने सौम्याची भूमिका साकारली आहे तर मराठमोळ्या रिंकूने नेत्राची भूमिका साकारली आहे.

गाण्यात रफ्तार सौम्याची कथा ऐकवतो आहे तर कृष्णा नेत्राची कहाणी सांगतो आहे. करण वाही हाही यात अभिनय करताना दिसतोय. सध्या हे गाणे तुफान गाजतेय. सोशल मीडियावर रिंकूच्या चाहत्यांनी या गाण्याला चांगलीच पसंती दिली आहे.अभिनेत्री रिंकू राजगुरु सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासोबत शेअर करत असते. तिचे विविध अंदाजातील आणि तिच्या चित्रपटाच्या संबंधीत असलेले फोटो ती यावर पोस्ट करत असते. तिच्या सगळ्याच फोटोंना तिच्या फॅन्सचा भरभरून प्रतिसाद मिळतो. सैराटच्या यशानंतर रिंकूने कधीच मागे वळून पाहिले नाही. या चित्रपटात आर्ची साकारणारी रिंकू राजगुरू भलतीच भाव खाऊन गेली.

काय आहे ‘हंड्रेड’ची कथा

‘हंड्रेड’ या वेबसिरीजमध्ये लारा दत्ता एसीपी सौम्या शुक्ला नावाची महिला पोलिसांची भूमिका साकारली आहे. तर रिंकूने एका गंभीर आजाराने पीडित तरूणी नेत्राची भूमिका जिवंत केली आहे़ स्विज्झर्लंड एकदा तरी पाहण्याचे स्वप्न उराशी बाळगणा-या नेत्राला अचानक ब्रेन ट्युमरचा आजार होतो. अशात प्रमोशन मिळवण्यासाठी धडपडणारी सौम्या नेऋाला अंडरकवर एजेंट बनवते. करण वाही याचीही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

टॅग्स :रिंकू राजगुरू