दीपिकासाठी रणवीर विमानतळावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2016 12:12 IST
अभिनेत्री दीपिका पादुकाने सोमवारी रात्री मुंबई विमानतळ येताच, तिला तेथे एक खास सरप्राईज मिळाले. तिला घेण्यासाठी तिचा बॉयफ्रेंड रणवीर ...
दीपिकासाठी रणवीर विमानतळावर
अभिनेत्री दीपिका पादुकाने सोमवारी रात्री मुंबई विमानतळ येताच, तिला तेथे एक खास सरप्राईज मिळाले. तिला घेण्यासाठी तिचा बॉयफ्रेंड रणवीर सिंग हा विमानतळावर गेला होता. दीपिका ही मागील काही दिवसापासून बंगळूरमध्ये आपल्या कुटुंबासोबत होती. आठवडाभरापूर्वी दीपिकाने एक फोटो इंस्टाग्रामवरती पोस्ट केला होता. त्या फोटोला रणवीर सिंगने लाइक केले होते. त्यानंतर ही पोस्ट सर्वत्र व्हायरल झाली व सोशल मीडीयावर त्याची खूप चर्चा झाली. दीपिका ही मुंबईला परतली व रणवीर तिला घेण्यासाठी जाणार नाही हे कसे काय शक्य आहे. दीपिका ही विमानतळावरून थेट चित्रपट निर्माता संजय लीला भंसाळीच्या कार्यालयात गेली.