Join us

​रणवीरचा न्यूड सेल्फी!!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2016 18:37 IST

रणवीरने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत तो न्यूड दिसतो आहे.

बॉलिवूड स्टार रणवीर सिंगला चर्चेत राहणे चांगलेच ठाऊक आहे. मंगळवारी त्याने सोशलमीडियावर शेअर केलेल्या एका फोटोची चर्चा दिवसभर सुरू आहे. रणवीरने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत तो न्यूड दिसतो आहे. आदित्य चोप्राच्या दिग्दर्शित ‘बेफ्रिके’या चित्रपटाचा ट्रेलर 10 आॅक्टोंबरला आयफेल टावरहून लाँच करण्यात येणार असल्याच्या बातम्या झळकत असतानाच त्याने आपला न्यूड फोटो शेअर करून धक्का दिला आहे. हा फोटो पाहिल्यावर तो खरच न्यूड आहे का याची शंका येते, मात्र लगेच त्याने काही घातलेच नाही असेही दिसते. त्याने हा फोटो आरश्यासमोर उभा राहून काढला आहे. त्याचा अर्धा चेहरा मोबाईलमुळे झाकला आहे. आता त्याचा हा फोटो खरच न्यूड आहे का? हे त्याचे त्यालाच ठाऊक! रणवीर सिंग ‘बेफ्रिके’तील किसिंग सिन्समुळे आधीच चर्चेत आला आहे. त्यात त्याने वाणी कपूरला रेकॉर्डब्रेक 28 वेळा किस केले आहे. आदित्य चोप्राने सेंसरची कात्री किसिंग सिन्स्वर चालू नये यासाठी विशेष काळजी घेतली असल्याचेही समजते. ‘बेफ्रिके’च्या ट्रेलर लाँचनंतर संजय लीला भन्साळीच्या ‘पद्मावती’च्या शूटिंगला तो सुरुवात करणार असल्याचे समजते. यात तो अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत दिसणार असून दीपिका पादुकोन पद्मावतीची भूमिका करणार आहे. शाहीद कपूरला राजा रतन सिंंगची भूमिका द्यावी यासाठी संजय लीला भन्साळीचे मन वळविण्यात तो यशस्वी ठरला असल्याचे सांगण्यात येते.याच आनंदाच्या भरात त्याने आपला न्यूड सेल्फी पोस्ट केला की काय? हे तर बॉलिवूडचा बाजीरावच सांगू शकेल.  ">http://