Join us

पॅरीसच्या चाहत्यांसाठी रणवीरचा न्यू गेटअप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2016 23:39 IST

बॉक्स आॅफीसवर जो सत्ता गाजवतो तो खरा सुपरस्टार. चाहत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी जो स्वत:मध्ये बदल घडवून आणतो तो चाहत्यांच्या मनातील सुपरस्टार. ...

बॉक्स आॅफीसवर जो सत्ता गाजवतो तो खरा सुपरस्टार. चाहत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी जो स्वत:मध्ये बदल घडवून आणतो तो चाहत्यांच्या मनातील सुपरस्टार. रणवीर सिंग या सर्व नीतिनियमांत स्वत:ला खरा ठरवतो.तो नुकताच त्याच्या पॅरिसच्या फ्रेंडसला भेटला. त्यांच्यासोबत त्याने फोटो काढले. तो सध्या आदित्य चोप्रा यांच्या आगामी चित्रपट ‘बेफि क्रे’ साठी शूटींगमध्ये व्यस्त आहे. रणवीर दिसल्यानंतर त्यांनी फोटो काढण्यासाठी विनंती केली आणि त्याने ती लगेचच मान्य देखील केली. खरंतर त्या फॅन्सचे आपण आभार मानायला हवेत कारण त्यांनी जर फोटो काढले नसते तर आपल्याला बेफि क्रे मधील त्याचा गेटअप कसा कळाला असता?