Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणवीरचा ‘बेफिक्रे’ अंदाज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2016 21:03 IST

रणवीर सिंग हा एकदम बिनधास्त अ‍ॅटिट्यूड आणि कूल लूक साठी त्याच्या चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. नुकताच तो म्हणे एका स्टोअर ...

रणवीर सिंग हा एकदम बिनधास्त अ‍ॅटिट्यूड आणि कूल लूक साठी त्याच्या चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. नुकताच तो म्हणे एका स्टोअर लाँच च्या कार्यक्रमासाठी गेला असता तिथे त्याने सर्वांना त्याच्या नेहमीच्या ढंगात खुश करून टाकले. त्याने पांढºया रंगाचा टी-शर्ट आणि निळ्या रंगाची डेनिम्स घातली होती त्यात तो अतिशय हँण्डसम दिसत होता. त्याने सायकलवर त्याची एन्ट्री घेतली. प्रत्येकाला तिथे वैयक्तिकपणे भेटला. त्यानंतर त्याने डिस्प्ले विंडोच्या येथे छानपैकी पोज दिली. ते पाहून त्याचे चाहते आणखीच फिदा झाले. तो सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘बेफिक्रे’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात त्याच्यासोबत वाणी कपूर असून चित्रपट ९ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.