रणवीर सिंहचे ‘हे’ वागणे दीपिका पादुकोणला जराही आवडले नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2017 13:38 IST
रणवीर सिंहच्या ड्रेसिंग सेन्सबद्दल बरेच काही लिहिले गेलेय. असेच काही पुन्हा पाहायला मिळाले. होय, सोशल मीडियावर रणवीरने आपला काळ्या ...
रणवीर सिंहचे ‘हे’ वागणे दीपिका पादुकोणला जराही आवडले नाही!
रणवीर सिंहच्या ड्रेसिंग सेन्सबद्दल बरेच काही लिहिले गेलेय. असेच काही पुन्हा पाहायला मिळाले. होय, सोशल मीडियावर रणवीरने आपला काळ्या रंगातील स्कर्ट घातलेला फोटो शेअर केला आणि या फोटोंवर प्रतिक्रियांचा अक्षरश: प्राऊस पडला. अलीकडे रणवीरने जीक्यू मॅगझिनच्या एका कार्यक्रमात भाग घेतला. या कार्यक्रमात रणवीर काळ्या रंगाची स्कर्ट घालून पोहोचला. या स्कर्टवरचा फोटो रणवीरने सोशल मीडियावर शेअर केला. बघता बघता ९० हजार लोकांनी या फोटोला लाईक केले. पण रणवीरची अगदी जवळची मैत्रिण दीपिका पादुकोण हिचे म्हणाल, तर तिला रणवीरचा हा लूक अजिबात आवडला नाही. रणवीरच्या या फोटोवर प्रतिक्रिया देताना दीपिकाने एक मोठ्ठा ‘नो’ लिहिला. शिवाय सोबत चेहरा लपवणारे तीन इमोजीही टाकेल. याचाच अर्थ रणवीरचा हा लूक दीपिकाला जराही आवडला नाही. दीपिका व रणवीर सध्या दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावती’मध्ये बिझी आहेत. यावर्षी नोव्हेंबरमध्ये हा चित्रपट रिलीज होतो आहे. रणवीर यात अलाऊद्दीन खिल्जीच्या भूमिकेत दिसणार आहे.रणवीर सिंह कायम अजब गजब स्टाईलमध्ये दिसतो. स्टाईल हे व्यक्त होण्याचे माध्यम आहे. यातून तुमचा स्वभाव, तुमच्या आवडीनिवडी, तुमचे मूड याचे प्रतिबिंब उमटते, असे रणवीर मानतो. मला आवडतात, ते पोशाख मी निवडतो. मी मूडनुसार पोशाख निवडतो. रणवीरला अमिताभ बच्चन सर्वाधिक स्टाईलिश वाटतात. पाठोपाठ करण जोहर आणि इम्रान खान यांचे नाव तो घेतो. अभिनेत्रींमध्ये दीपिका पादुकोण आणि कंगना राणौत यांची ड्रेसिंग स्टाईल रणवीरला आवडते.