रणवीर सिंगच्या आजीचे निधन; तिच्यामुळेच बनला अभिनेता!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2018 12:14 IST
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग याच्या आजीचे वृद्धापकाळाने आज निधन झाले. ही दु:खद बातमी मिळताच, रणवीरने आपली सर्व नियोजित कामे ...
रणवीर सिंगच्या आजीचे निधन; तिच्यामुळेच बनला अभिनेता!
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग याच्या आजीचे वृद्धापकाळाने आज निधन झाले. ही दु:खद बातमी मिळताच, रणवीरने आपली सर्व नियोजित कामे व शूट रद्द केले. गेल्या अनेक दिवसांपासून रणवीरची आजी आजारी होती. त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गत जानेवारीत रणवीरच्या आजीची प्रकृती जास्तच खालावली होती. यावेळी दीपिकाही त्यांना भेटायला रणवीरच्या घरी पोहोचली होती. रणवीर आपल्या आजीच्या अतिशय जवळ होता. एका मुलाखतीत त्याने याबद्दल सांगितले होते. माझ्या जडणघडणीत माझ्या आजीचा मोठा वाटा आहे. मला आॅक्सिजन आणि पाणी गरजेचा आहे, तितकीच ती. तिनेच मला हिरो बनण्याचे स्वप्न दाखवले, असे त्याने सांगितले होते.रणवीर ८ वर्षांचा असताना त्याने अमिताभ यांच्या ‘हम’ चित्रपटातील गाण्यावर लाईव्ह डान्स केला होता. हा डान्स पाहून माझ्या आजीने माझे अपार कौतुक केले होते. तिने माझ्यात अभिनेता बनण्याचे स्वप्न पेरले होते, असेही त्याने सांगितले होते.रणवीरच्या अतिशय जवळ असलेल्या काही लोकांच्या मते, रणवीर व आजी एखाद्या मित्र-मैत्रिणीसारखे वागायचे. दीपिका सर्वाधिक चांगली मैत्रिण झाल्यावर रणवीरने सर्वप्रथम तिला आजीशीच भेटवले होते. रणवीर आपल्या आजीसोबत सगळ्या गोष्टी शेअर करायचा. इतकी प्रिय आजी सोडून गेल्यावर रणवीरचे दु:ख आपण समजू शकतो. रणवीरच्या आजीला विनम्र श्रद्धांजली देऊ यात आणि रणवीरला या दु:खातून बाहेर येण्याची शक्ती मिळो, ही सदिच्छा व्यक्त करूया.तूर्तास रणवीर ‘गली बॉय’ या चित्रपटात व्यस्त आहे. यानंतर तो रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’मध्येही दिसणार आहे.ALSO READ : सोनम कपूरच्या पतीला उचलून घेत रणवीर सिंगने केला डान्स, पाहा व्हिडीओ!