शॉकिंग अवस्थेत असलेल्या रणवीर सिंगचा चाहत्याने काढला चक्क व्हिडीओ अन् मग...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2018 20:50 IST
अभिनेता रणवीर सिंगने आपल्या चाहत्यासोबत घडलेला एक अतिशय शॉकिंग अनुभव मीडियाशी शेअर केला आहे. बॉम्बे टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत ...
शॉकिंग अवस्थेत असलेल्या रणवीर सिंगचा चाहत्याने काढला चक्क व्हिडीओ अन् मग...!
अभिनेता रणवीर सिंगने आपल्या चाहत्यासोबत घडलेला एक अतिशय शॉकिंग अनुभव मीडियाशी शेअर केला आहे. बॉम्बे टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत रणवीरने म्हटले की, एकदा मी स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करीत होतो. त्याचवेळी एका चाहत्याने माझा व्हिडीओ काढला. रणवीरने सांगितले की, त्यावेळी मी नग्न अवस्थेत होतो. त्यामुळे हा व्हिडीओ जर व्हायरल झाला असता तर मला त्याबद्दल खूप त्रास सहन करावा लागला असता. रणवीरने हा मजेशीर किस्सा सांगताना म्हटले की, ‘मी माझ्या चेंजिंग रूममध्ये पूर्णपणे नग्न अवस्थेत होतो. मी एका स्टॉलजवळ डोक्याचे केस पुसत होतो. तेव्हा मी बघितले की, एक मुलगा माझ्या या अवस्थेतील एक व्हिडीओ बनवित आहे. तेव्हा मी त्याला म्हटले की, अरे लाइट तर बंद करायचा असता, कदाचित पकडला गेला नसता. पुढे रणवीरने लगेचच त्या चाहत्याकडून तो व्हिडीओ डिलीट करून घेतला. रणवीरने सांगितले की, मी त्या मुलाला बघितल्यानंतर त्याच अवस्थेत चेंजिंग रूममधून पळत सुटलो. जोरजोरात ओरडताना ‘ऐ’ एवढाच शब्द माझ्या तोंडून बाहेर येत होता. तुम्ही असा विचार करू शकता काय की, मी चक्क नग्न अवस्थेत पळत सुटलो होता अन् ‘ऐ, ऐ’ म्हणत ओरडत होतो, नाही ना? पण हे खरं आहे. मी त्या मुलाला पकडण्यासाठी त्याच्या मागे पळालो. अखेर त्याचा हात पकडून त्याच्याकडे असलेला मोबाइल हिसकावून घेतला. तसेच त्याच्याकडून तो व्हिडीओ लगेचच डिलीट करून घेतला. जर हा व्हिडीओ व्हायरल झाला असता तर, मला त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागला असता. खरं तर माझ्याबाबतीत असे नेहमीच घडत असते, असेही रणवीर म्हणाला. दरम्यान, रणवीर लवकरच दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या आगामी ‘सिम्बा’ या चित्रपटात बघावयास मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटासाठी अभिनेत्रीचे नाव निश्चित नव्हते. अखेर सारा अली खान हिचे नाव निश्चित करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त रणवीर ‘गली बॉय’ चित्रपटातही बघावयास मिळणार आहे.