Dhurandhar First Look Out: बॉलिवूडचा एनर्जेटिक अभिनेता रणवीर सिंग तब्बल दोन वर्षांनंतर मुख्य भूमिकेतून मोठ्या पडद्यावर परत येतोय. 'सिंघम अगेन'मध्ये छोटीशी झलक दाखवलेल्या सिंबाचा नवीन चित्रपट 'धुरंधर' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. विशेष म्हणजे आज रणवीरचा वाढदिवस असून त्याच निमित्ताने या चित्रपटातील त्याचा पहिला लूक रिलीज झाला आहे.
'धुरंधर'च्या टीझरमध्ये रणवीर सिंग धाकड लूकमध्ये पाहायला मिळतोय. टीझरमध्ये खूप रक्तपात दिसून येत असून हा चित्रपट ॲक्शनने भरलेला आहे. 'धुरंधर' हा येत्या ५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये अनेक मोठे कलाकार देखील पाहायला मिळणार आहेत. या अॅक्शनपटात रणवीरसह संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना आणि यामी गौतम यांसारखे दिग्गज कलाकारही झळकणार आहेत. 'धुरंधर'च्या टीझर पाहिल्यानंतर रणवीर सिंगचे चाहते खूप आनंदी झालेत.
जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि बी६२ स्टुडिओज प्रोडक्शनची "धुरंधर" ही चित्रपट कथा 'उरी: द सर्जिकल स्ट्राईक' फेम राष्ट्रीय पुरस्कार विजेते आदित्य धर यांनी लिहिली, दिग्दर्शित आणि निर्मित केली आहे. चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे आणि लोकेश धर यांनी केली आहे. हा चित्रपट त्या अज्ञात पुरुषांची, अनकही कथा उलगडेल जी आजवर गुप्त राहिली आहे. पिंकव्हिलाच्या वृत्तानुसार, 'धुरंधर'चे बहुतांश शूटिंग पूर्ण झालं असून फक्त २५ दिवसांचे शूट शिल्लक आहे. पोस्ट प्रॉडक्शनचे काम सप्टेंबर अखेरीस सुरू होईल आणि ऑक्टोबर अखेर संपुर्ण प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यानंतर सिनेमाचं प्रमोशन सुरू होईल. या अॅक्शनपटात रणवीरसह संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना आणि यामी गौतम यांसारखे दिग्गज कलाकारही झळकणार आहेत.
'धुरंधर'नंतर रणवीर फरहान अख्तरच्या 'डॉन ३'मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. 'डॉन-३' मध्ये सर्वांत पहिल्यांदा रणवीर सिंगची अभिनेत्री म्हणून कियारा आडवाणी हिच्या नावावर शिक्कामोर्तब झालं होतं. पण, कियारा गर्भवती राहिल्यानं तिनं हा 'डॉन 3' चित्रपट सोडला. कियारानंतर मराठमोळ्या शर्वरी वाघच्या नावावर चर्चा सुरू होती. पण, आता शर्वरी वाघ नाही तर क्रिकेटपटू धोनी याची होणारी मेव्हणी 'डॉन ३'मध्ये झळकणार आहे. पिंकव्हिलानुसार, अभिनेत्री क्रिती सनॉन हिची 'डॉन-३'मध्ये एन्ट्री केली आहे. क्रिती सनॉन हिचा बॉयफ्रेंड कबीर बहिया हा धोनीची पत्नी साक्षी हिचा चुलत भाऊ आहे.