Join us

​रणवीर सिंग म्हणतो, ज्यादिवशी लग्न ठरेल स्वत: छतावर उभे होत ओरडून ओरडून जगाला सांगेल...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 14:00 IST

सध्या रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण या दोघांच्या लग्नाच्या बातम्यांना जोर चढला आहे. चालू वर्षांच्या अखेरिसपर्यंत रणवीर व दीपिका  ...

सध्या रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण या दोघांच्या लग्नाच्या बातम्यांना जोर चढला आहे. चालू वर्षांच्या अखेरिसपर्यंत रणवीर व दीपिका  लग्न करणार, अशी चर्चा आहे. अर्थात रणवीर व दीपिका लग्नाच्या बातम्यांवर काहीही बोलायला तयार नाहीत. खरे तर रणवीरने दीपिकासोबतचे रिलेशन कधीही लपवलेले नाही. जे आहे, ते तो कायम बेधडक बोलला. दीपिकावरच्या प्रेमाची कबुली असो किंवा तिच्यासोबत वेळ घालवणे असो, त्याने कधीच कुठला आडपडदा ठेवला नाही. ताज्या मुलाखतीतही रणवीर दीपिकाबद्दल भरभरून बोलला. दीपिकासोबतचे तुझे नाते कसे आहे, असा प्रश्न रणवीरला यावेळी केला गेला आणि रणवीरने आपल्या मनातील तिच्याबद्दलच्या सगळ्या प्रामाणिक भावना बोलून दाखवल्या. दीपिका माझ्या आयुष्यातील खास व्यक्ती आहे. ती एक प्रतिभावान अभिनेत्री आहे आणि मी तिला प्रचंड मानतो. तिच्यासोबत काम करण्याचा अनुभव तुम्हाला खूप काही शिकवून जातो. ‘गोलियों की रासलीला- रामलीला’चे शूटींग करताना मला आठवते की, दीपिका न थकता काम करत होती. या चित्रपटासोबतचं ‘चेन्नई एक्स्प्रेस’ आणि ‘ये जवानी है दिवानी’ या तिच्या दोन चित्रपटांचेही शूटींग सुरू होते. पण सेटवर दीपिका कधीही थकलेली, चिडलेली मला दिसली नाही. तिच्यातील कंपने मला आवडता. ती कमालीची शांत आहे, अगदी एखाद्या बौद्ध भिक्षूसाररखी, असे रणवीर म्हणाला.ALSO READ : लग्नाच्या बातम्यांवर अखेर दीपिका पादुकोणने तोडली चुप्पी! जाणून घ्या बॉलिवूडच्या ‘मस्तानी’चे उत्तर!!माझ्या व दीपिकाच्या लग्नाच्या बातम्यांमध्ये सध्या तरी काहीही तथ्य नाही. यावर्षी तरी लग्नाचा कुठलाही विचार नाही. आम्ही दोघेही सध्या प्रचंड व्यस्त आहोत. शिवाय दीपिका बॅकपेनमुळे त्रस्त आहे. ज्यादिवशी माझे लग्न ठरेल, त्यादिवशी मी स्वत: छतावर उभे राहून मोठ मोठ्याने ओरडून संपूर्ण जगाला ही माहिती देईल, असेही रणवीरने स्पष्ट केले.